S M L

पुणे फेस्टिव्हलला सुरुवात

17 सप्टेंबरपुण्यातील गणेशोत्सवाचे खास आकर्षण असणार्‍या 22 व्या पुणे फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात झाली आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच इथे हा कार्यक्रम सुरू आहे. केंद्रीय अपारंपरिक ऊर्जामंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. यावेळी पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, गृहराज्यमंत्री रमेश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी आणि ईशा देओल यांच्या गणेश वंदनेने झाली. ज्येष्ठ उद्योजिका अनु आगा, ज्येष्ठ गायिका किशोरी आमोणकर, आणि उद्योजक सायरस पुनावाला यांना पुणे फेस्टिव्हल सन्मानानी गौरवण्यात आले. यानंतर वेगवेगळ्या अभिनेत्रींचा समावेश असणार्‍या लावणी बावनखणी हा कार्यक्रम सादर झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 17, 2010 02:55 PM IST

पुणे फेस्टिव्हलला सुरुवात

17 सप्टेंबर

पुण्यातील गणेशोत्सवाचे खास आकर्षण असणार्‍या 22 व्या पुणे फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात झाली आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच इथे हा कार्यक्रम सुरू आहे.

केंद्रीय अपारंपरिक ऊर्जामंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. यावेळी पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, गृहराज्यमंत्री रमेश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी आणि ईशा देओल यांच्या गणेश वंदनेने झाली. ज्येष्ठ उद्योजिका अनु आगा, ज्येष्ठ गायिका किशोरी आमोणकर, आणि उद्योजक सायरस पुनावाला यांना पुणे फेस्टिव्हल सन्मानानी गौरवण्यात आले.

यानंतर वेगवेगळ्या अभिनेत्रींचा समावेश असणार्‍या लावणी बावनखणी हा कार्यक्रम सादर झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 17, 2010 02:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close