S M L

शेतकर्‍यांना आता कर्जमाफी नाही

18 सप्टेंबरकर्जमाफी हा शेतकर्‍यांच्या समस्येवर उपाय नाही. आणि बदलत्या काळात वारंवार कर्जमाफी देता येणार नाही, असे कृषिमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. ते अकोल्यात बोलत होते.शेतकर्‍यांच्या हितासाठी कापूस निर्यात थांबवली जाणार नाही, असेही ते म्हणाले. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या आणि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमासाठी पवार आज अकोल्यात आहेत.पवारांचा रेल्वे प्रवासपवार आज अकोला दौर्‍यावर आहेत. काल विदर्भ एक्सप्रेसने शरद पवार अकोल्यासाठी रवाना झाले होते. तब्बल 6 वर्षांनंतर त्यांनी रेल्वेने प्रवास केला आहे. सकाळी साडेचार वाजता विदर्भ एक्सप्रेस अकोला स्टेशनवर पोहोचली, त्यावेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या आणि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमाला ते आज उपस्थित राहणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 18, 2010 10:42 AM IST

शेतकर्‍यांना आता कर्जमाफी नाही

18 सप्टेंबर

कर्जमाफी हा शेतकर्‍यांच्या समस्येवर उपाय नाही. आणि बदलत्या काळात वारंवार कर्जमाफी देता येणार नाही, असे कृषिमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. ते अकोल्यात बोलत होते.

शेतकर्‍यांच्या हितासाठी कापूस निर्यात थांबवली जाणार नाही, असेही ते म्हणाले. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या आणि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमासाठी पवार आज अकोल्यात आहेत.

पवारांचा रेल्वे प्रवास

पवार आज अकोला दौर्‍यावर आहेत. काल विदर्भ एक्सप्रेसने शरद पवार अकोल्यासाठी रवाना झाले होते. तब्बल 6 वर्षांनंतर त्यांनी रेल्वेने प्रवास केला आहे.

सकाळी साडेचार वाजता विदर्भ एक्सप्रेस अकोला स्टेशनवर पोहोचली, त्यावेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या आणि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमाला ते आज उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2010 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close