S M L

नांदेडमध्ये तख्तस्नानाचा सोहळा संपन्न

27 ऑक्टोबर, नांदेड - गेल्या काही दिवसांपासून नांदेडमध्ये गुरू ता गद्दी सोहळ्याच्या तयारीची धामधूम सुरू होती. आता ख-या अर्थाने सोहळ्याला सुरुवात झाली आहे. शीख धमिर्यांच्या गुरू-ता-गद्दी सोहळ्यात महत्त्वपूर्ण असं तख्त स्नान होत आहे. या समारंभासाठी हजारोंच्या संख्येनं शीख बांधव नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. 'गुरू - ता- ग्रंथसाहेब' या ग्रंथाला गुरुस्थान प्राप्त होऊन यावर्षी 300 वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं गुरु -ता- गद्दी समारंभाची त्रिशताब्दी नांदेडला साजरी होत आहे. यानिमित्तानं गोविंदसिंगजी गुरुद्वारामध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. त्यात सोमवारी होणा-या तख्त स्नानाला खूपच महत्त्व आहे. या तख्त स्नानात गुरुद्वारा परिसर गोदावरी नदीच्या पाण्याने धुवून काढण्यात येतो. या समारंभात गुरू ग्रंथसाहेबांचं तख्त आणि सर्व शस्त्रांनाही स्नान घातलं जातं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 27, 2008 11:24 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2008 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close