S M L

लंडनमधल्या नॅशनल गॅलरीतही साजरी झाली दिवाळी

भारताबरोबरच परदेशातही दिवाळी दणक्यात साजरी होत आहे. लंडनमधल्या ट्रफॅल्गार चौकात सालाबाद प्रमाणं यंदाही दिवाळी समारंभ आयोजित करण्यात आली. वार्षिक दिवाळी समारंभासाठी लंडनमधल्या ट्रफॅल्गर चौकात हजारो लोक जमले होते. त्याचबरोबर यंदा लंडनच्या नॅशनल गॅलरीमध्येही दिवाळीनिमित्त एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिव्यांचा हा सण लंडनमधल्या नॅशनल गॅलरीत काहीशा वेगळ्या पद्धतीनं साजरा केला गेला. भारताताल्या आर्ट स्कूलमधले डान्सर आणि संगीतकार यांनी येथे आपल्या कला सादर केल्या. दिवाळीचं महत्त्व सांगणा-या रामायणातल्या कथांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. गॅलरीमधला गर्दी खेचणारा दुसरा विभाग होता कथाकथन. युरोपियन कलाकारांनी काढलेल्या पेंटिंग्जच्या आधारावर हा कथाकथनाचा कार्यक्रम होता. लंडनच्या नॅशनल गॅलरीमध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 27, 2008 12:02 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 27, 2008 12:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close