S M L

पंतप्रधान येती गावा, तोचि दिवाळी दसरा...

25 सप्टेंबरयुनिक आयडेन्टीटी कार्ड वाटपाचा शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यापासून पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे सध्या इथे शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. हा कार्यक्रम शहादा तालुक्यातील टेंभली गावात होणार आहे. त्यामुळे 'पंतप्रधान येती गावा तोचि दिवाळी दसरा' असा अनुभव सध्या जिल्ह्यातले लोक घेत आहेत.धडगाव तालुक्यातील 700 मजुरांना रोजगार हमीच्या कामावरील धान्य कुपन्स मिळाली होती. त्यावरील धान्य मिळण्यासाठी गेल्या 5 वर्षांपासून त्यांनी बराच संघर्ष केला. निवेदने दिली, मोर्चे काढले पण शासकीय यंत्रणा बधत नव्हती. आता मात्र, पंतप्रधान येणार म्हणून 5 वर्षांपूर्वीची त्यांची मागणी त्वरीत मंजूर झाली आहे. त्यांनी फटाके फोडून हा आनंद साजरा केला. या मजुरांना त्यांचे हक्काचे धान्य मिळाले. पण त्यासाठी त्यांना पंतप्रधानांची वाट पाहावी लागली हेच दुदैर्व...

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 25, 2010 02:29 PM IST

पंतप्रधान येती गावा, तोचि दिवाळी दसरा...

25 सप्टेंबर

युनिक आयडेन्टीटी कार्ड वाटपाचा शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यापासून पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. त्यामुळे सध्या इथे शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. हा कार्यक्रम शहादा तालुक्यातील टेंभली गावात होणार आहे. त्यामुळे 'पंतप्रधान येती गावा तोचि दिवाळी दसरा' असा अनुभव सध्या जिल्ह्यातले लोक घेत आहेत.

धडगाव तालुक्यातील 700 मजुरांना रोजगार हमीच्या कामावरील धान्य कुपन्स मिळाली होती. त्यावरील धान्य मिळण्यासाठी गेल्या 5 वर्षांपासून त्यांनी बराच संघर्ष केला. निवेदने दिली, मोर्चे काढले पण शासकीय यंत्रणा बधत नव्हती.

आता मात्र, पंतप्रधान येणार म्हणून 5 वर्षांपूर्वीची त्यांची मागणी त्वरीत मंजूर झाली आहे. त्यांनी फटाके फोडून हा आनंद साजरा केला. या मजुरांना त्यांचे हक्काचे धान्य मिळाले. पण त्यासाठी त्यांना पंतप्रधानांची वाट पाहावी लागली हेच दुदैर्व...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2010 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close