S M L

अयोध्या निकाल थोड्याच वेळात

30 सप्टेंबरअयोध्येतील वादग्रस्त जमिनीचा निकाल आता थोड्याच वेळात अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्या आणि लखनौसह देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 2 लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. अलाहाबाद हायकोर्टाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निकाल वाचन करत असताना, कोर्टात फक्त 27 पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना प्रवेश देण्यात आला आहे. मीडियालाही कोर्टापासून दूर ठेवण्यात आले आहे. शांततेचे आवाहननिकालानंतर सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन केंद्र सरकार तसेच सर्व राजकीय पक्षांनी केले आहे. केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी सगळ्यांना शांततेचे आवाहन केले आहे.अयोध्या प्रकरणाचा निकाल काहीही आला तरी त्यावर सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा मार्ग दोन्ही पक्षांना खुला आहे. त्यामुळे हा निकाल सर्वांनी शांततेने स्वीकारावा, असे आवाहन भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले आहे.अयोध्या खटल्याचा निकाल जे न्यायमूर्ती देणार आहेत. त्याच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात...न्यायमूर्ती एस. यू. खानएएमयूमधून एलएलबीची पदवीअलीगढमध्ये वकील म्हणून कारकिर्दीला सुरुवातन्यायमूर्ती सुधीर अग्रवालमेरठ युनिव्हर्सिटीमधून एलएलबीउत्तर प्रदेशचे माजी ऍडिशनल जनरल न्यायमूर्ती डी. व्ही. शर्मा उद्या सेवेतून निवृत्त होत आहेतते 2009 मध्ये हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनले. संसदीय कामकाजाचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे.ग्राम सेवाग्राम लांबणीवर अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई काँग्रेसने 2 ऑक्टोबरला होणारा ग्राम ते सेवाग्राम हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे. काँग्रेस प्रवक्ते कन्हैय्यालाल गिडवानी यांनी ही माहिती दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 30, 2010 07:51 AM IST

अयोध्या निकाल थोड्याच वेळात

30 सप्टेंबर

अयोध्येतील वादग्रस्त जमिनीचा निकाल आता थोड्याच वेळात अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्या आणि लखनौसह देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 2 लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. अलाहाबाद हायकोर्टाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

निकाल वाचन करत असताना, कोर्टात फक्त 27 पक्षकार आणि त्यांच्या वकिलांना प्रवेश देण्यात आला आहे. मीडियालाही कोर्टापासून दूर ठेवण्यात आले आहे.

शांततेचे आवाहन

निकालानंतर सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन केंद्र सरकार तसेच सर्व राजकीय पक्षांनी केले आहे. केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी सगळ्यांना शांततेचे आवाहन केले आहे.

अयोध्या प्रकरणाचा निकाल काहीही आला तरी त्यावर सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा मार्ग दोन्ही पक्षांना खुला आहे. त्यामुळे हा निकाल सर्वांनी शांततेने स्वीकारावा, असे आवाहन भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले आहे.

अयोध्या खटल्याचा निकाल जे न्यायमूर्ती देणार आहेत. त्याच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात...

न्यायमूर्ती एस. यू. खानएएमयूमधून एलएलबीची पदवीअलीगढमध्ये वकील म्हणून कारकिर्दीला सुरुवात

न्यायमूर्ती सुधीर अग्रवालमेरठ युनिव्हर्सिटीमधून एलएलबीउत्तर प्रदेशचे माजी ऍडिशनल जनरल

न्यायमूर्ती डी. व्ही. शर्मा उद्या सेवेतून निवृत्त होत आहेतते 2009 मध्ये हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनले. संसदीय कामकाजाचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे.

ग्राम सेवाग्राम लांबणीवर

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई काँग्रेसने 2 ऑक्टोबरला होणारा ग्राम ते सेवाग्राम हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे. काँग्रेस प्रवक्ते कन्हैय्यालाल गिडवानी यांनी ही माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 30, 2010 07:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close