S M L

इंडिया दिखा दिया...

3 ऑक्टोबरटीका, वाद, भ्रष्टाचाराच्या आरोपांचे मळभ पुसून टाकत दिल्लीत 19 व्या कॉमनवेल्थ गेम्सचे भव्य आणि दिव्य उदघाटन झाले. देशभरातून राजधानीत दाखल झालेल्या कलाकारांनी नेत्रदिपक ‘हदम ऑफ इंडिया’तून ख•या अर्थाने जगाला ‘इंडिया दिखा दिया’...उदघाटन सोहळा पाहून 71 देशांतील खेळाडू हरखून गेले. हेलियमचा भव्य पडदा 25 मीटर उचीवर उचलला गेला. आठ महाकाय कठपुतळ्यांनी त्याखाली फेर धरला आणि 60 हजार प्रेक्षकांनी भरलेले स्टेडियम मंत्रमुग्ध झाले. शंखनाद, नगारे, तुता•यांच्या निनादाने अवकाश भारून टाकले. गायक हरिहरन यांनी सादर केलेले स्वागतम् हे गीत आणि संगीतकार ए. आर. रेहमानच्या ‘जय हो’ने या कार्यक्रमावर कळस चढवला. या ऐतिहासिक सोहळ्याचे उदघाटन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्स फिलिप यांनी केले. यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला उपस्थित होत्या.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 3, 2010 07:14 AM IST

इंडिया दिखा दिया...

3 ऑक्टोबर

टीका, वाद, भ्रष्टाचाराच्या आरोपांचे मळभ पुसून टाकत दिल्लीत 19 व्या कॉमनवेल्थ गेम्सचे भव्य आणि दिव्य उदघाटन झाले.

देशभरातून राजधानीत दाखल झालेल्या कलाकारांनी नेत्रदिपक ‘हदम ऑफ इंडिया’तून ख•या अर्थाने जगाला ‘इंडिया दिखा दिया’...उदघाटन सोहळा पाहून 71 देशांतील खेळाडू हरखून गेले.

हेलियमचा भव्य पडदा 25 मीटर उचीवर उचलला गेला. आठ महाकाय कठपुतळ्यांनी त्याखाली फेर धरला आणि 60 हजार प्रेक्षकांनी भरलेले स्टेडियम मंत्रमुग्ध झाले. शंखनाद, नगारे, तुता•यांच्या निनादाने अवकाश भारून टाकले.

गायक हरिहरन यांनी सादर केलेले स्वागतम् हे गीत आणि संगीतकार ए. आर. रेहमानच्या ‘जय हो’ने या कार्यक्रमावर कळस चढवला.

या ऐतिहासिक सोहळ्याचे उदघाटन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्स फिलिप यांनी केले. यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला उपस्थित होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2010 07:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close