S M L

'आरे'ला द्या, 'का रे'ने उत्तर...

6 ऑक्टोबरराजकारणात शांत राहून चालत नाही, 'आरे' ला 'का रे'नेच उत्तर द्यावे लागते... राजकारणाचे हे वास्तव सांगितले आहे, महात्मा गांधींचा वारसा सांगणार्‍या काँग्रेसचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांनी... एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा, हे गांधींजींच्या काळात ठीक होते, आता नाही.. असेही ते म्हणाले. राज्याचे कृषीमंत्री बाळासाहेब थोरात स्वभावाने मृदू आहेत. मात्र हल्लीच्या राजकारणात असे असून चालत नाही, असे सांगत त्यांनी बाळासाहेबांना हा सल्ला दिला आहे. सतत गांधींचा वारसा सांगणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांनीच अहिंसेच्या विचारांची खिल्ली उडवल्याने आता आश्चर्य व्यक्त होत आहे. संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे नाव भाऊसाहेब थोरात असे ठेवण्यात आले आहे. या नामकरण कार्यक्रमासाठी विलासराव संगमनेर इथे आले होते. त्यावेळी त्यांनी हे विचार व्यक्त केले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 6, 2010 11:07 AM IST

6 ऑक्टोबर

राजकारणात शांत राहून चालत नाही, 'आरे' ला 'का रे'नेच उत्तर द्यावे लागते... राजकारणाचे हे वास्तव सांगितले आहे, महात्मा गांधींचा वारसा सांगणार्‍या काँग्रेसचे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांनी... एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा, हे गांधींजींच्या काळात ठीक होते, आता नाही.. असेही ते म्हणाले.

राज्याचे कृषीमंत्री बाळासाहेब थोरात स्वभावाने मृदू आहेत. मात्र हल्लीच्या राजकारणात असे असून चालत नाही, असे सांगत त्यांनी बाळासाहेबांना हा सल्ला दिला आहे. सतत गांधींचा वारसा सांगणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांनीच अहिंसेच्या विचारांची खिल्ली उडवल्याने आता आश्चर्य व्यक्त होत आहे.

संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे नाव भाऊसाहेब थोरात असे ठेवण्यात आले आहे. या नामकरण कार्यक्रमासाठी विलासराव संगमनेर इथे आले होते. त्यावेळी त्यांनी हे विचार व्यक्त केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2010 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close