S M L

नांदेडमध्ये फुलले सेवेक-यांचे मळे

28 ऑक्टोबर, नांदेड - मानवसेवा हीच खरी ईश्वराची सेवा मानली जाते. शीख धर्मात सेवेला अतिशय महत्त्व आहे. हीच श्रध्दा मनात बाळगून शेकडो शीख बांधव स्वतःला सेवेत वाहून घेतात. गुरू -ता- गद्दी कार्यक्रमात सेवा करण्यासाठी अनेक जण स्वतःहून समोर येत आहेत.गेल्या बारा वर्षांपासून गुरुद्वारात येणा-या भाविकांना पाणी देण्याची सेवा बाबा मेजरसिंग जाट करतात. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्या पाठीवर पाण्याची टाकी असते. तहानलेल्यांना पाणी देण्यात जो आनंद मिळतो, त्याला इतर कशाची सर नसल्याचं ते सांगतात. बाबांच्या घरी शेती आहे. स्वतःचा संसार आहे. पण, आपल्या धर्मातल्या शिकवणीनुसार त्यांचा संपूर्ण दिवस गुरूद्वारातल्या भाविकांची तहान भागवण्यात जातो. त्यांच्यासारखे अनेक जण इथे सेवा करण्यासाठी आले आहेत. शीख धर्मात असणारं सेवेचं महत्त्व नांदेडमध्ये दिसून येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 28, 2008 01:22 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 28, 2008 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close