S M L

नर्मदा बचाव आंदोलनाला 25 वर्ष पूर्ण

22 ऑक्टोबरविकास हवा म्हणत लढाई सुरू करणा-या नर्मदा बचाव आंदोलनाला आता 25 वर्ष पूर्ण होत आहे. देशाच्या पुनर्वसन धोरणापासून जागतिक बँकेच्या मोठ्या प्रकल्पांच्या निर्णयांपर्यंत घाटीतला संघर्ष निर्णायक ठरला आहे.यानिमित्तानेघाटीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. गेल्या पंचवीस वर्षात या आंदोलनाने बरेच चढउतार पाहिले. या आंदोलनाचा प्रभाव देशाच्या पुनर्वसन कायद्यापासून ते जागतिक बँकेच्या धोरणांवर पडलेला दिसला. नर्मदा बचाव आंदोलनाने अनेक कार्यकर्ते घडवले.घाटीतल्या कुंभारांनी, मच्छिमारांनी दिलेली लढत अहिंकस मार्गानं पुढे सुरू ठेवायची आहे. जलजमिनीच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करून विश्व बँकेला हटवले. आताही लढाई थांबलेली नाही. जंगल, जमिनीचे अधिकार घ्यायचे आहेत. आदिवासींच्या स्वशासनाच्या कायद्याची अमलबजावणी होत नाही. विकास नियोजनाचा अधिकार मिळावा यासाठी कायद्याची गरज आहे. आता ही लढाई एकट्या घाटीची राहिलेली नाही. वैश्विकरणाला आव्हान देत हिंसा टाळत अजूनही बरंच काही साध्य करायचे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 22, 2010 03:01 PM IST

नर्मदा बचाव आंदोलनाला 25 वर्ष पूर्ण

22 ऑक्टोबर

विकास हवा म्हणत लढाई सुरू करणा-या नर्मदा बचाव आंदोलनाला आता 25 वर्ष पूर्ण होत आहे.

देशाच्या पुनर्वसन धोरणापासून जागतिक बँकेच्या मोठ्या प्रकल्पांच्या निर्णयांपर्यंत घाटीतला संघर्ष निर्णायक ठरला आहे.

यानिमित्तानेघाटीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

गेल्या पंचवीस वर्षात या आंदोलनाने बरेच चढउतार पाहिले. या आंदोलनाचा प्रभाव देशाच्या पुनर्वसन कायद्यापासून ते जागतिक बँकेच्या धोरणांवर पडलेला दिसला.

नर्मदा बचाव आंदोलनाने अनेक कार्यकर्ते घडवले.घाटीतल्या कुंभारांनी, मच्छिमारांनी दिलेली लढत अहिंकस मार्गानं पुढे सुरू ठेवायची आहे.

जलजमिनीच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करून विश्व बँकेला हटवले. आताही लढाई थांबलेली नाही. जंगल, जमिनीचे अधिकार घ्यायचे आहेत.

आदिवासींच्या स्वशासनाच्या कायद्याची अमलबजावणी होत नाही. विकास नियोजनाचा अधिकार मिळावा यासाठी कायद्याची गरज आहे.

आता ही लढाई एकट्या घाटीची राहिलेली नाही. वैश्विकरणाला आव्हान देत हिंसा टाळत अजूनही बरंच काही साध्य करायचे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2010 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close