S M L

शिवसेनेची शाहरुख खानवर पुन्हा टीका

26 नोव्हेंबरशिवसेनेनं पुन्हा एकदा अभिनेता शाहरुख खानला टार्गेट केलय शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून शाहरुखवर टिका करण्यात आलीय. 26/11 हल्ल्याला आज दोन वर्षे पूर्ण होत असतांना शाहरुख खान मात्र पाकिस्तानी चॅनेलसाठी नाच-गाण्यासह डिनर पार्टीचा कार्यक्रम करण्यात मशगूल आहे असं वृत्त देण्यात आलं. यापूर्वी सुध्दा आयपीएल स्पर्धेतून पाक खेळांडूना वगळल्यावर खानने प्रचंड थयथयाट केला होता. शेवटी शाहरुख खानचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे अशी टिका सामना वृत्तपत्रात करण्यात आली. ए गाला डीनर विथ शाहरुख खान असं या कार्यक्रमाचं नाव असून लंडनमध्ये हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलाय. प्राईम टिव्ही या चॅनेलसाठी शाहरुख हा कार्यक्रम करतोय. गेल्या दहा वर्षापासून या चॅनेलचे युरोपातील पाकिस्तानी जनतेसाठी 24 तास प्रक्षेपण सुरु करण्यात आलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2010 10:21 AM IST

शिवसेनेची शाहरुख खानवर पुन्हा टीका

26 नोव्हेंबर

शिवसेनेनं पुन्हा एकदा अभिनेता शाहरुख खानला टार्गेट केलय शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून शाहरुखवर टिका करण्यात आलीय. 26/11 हल्ल्याला आज दोन वर्षे पूर्ण होत असतांना शाहरुख खान मात्र पाकिस्तानी चॅनेलसाठी नाच-गाण्यासह डिनर पार्टीचा कार्यक्रम करण्यात मशगूल आहे असं वृत्त देण्यात आलं. यापूर्वी सुध्दा आयपीएल स्पर्धेतून पाक खेळांडूना वगळल्यावर खानने प्रचंड थयथयाट केला होता. शेवटी शाहरुख खानचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे अशी टिका सामना वृत्तपत्रात करण्यात आली. ए गाला डीनर विथ शाहरुख खान असं या कार्यक्रमाचं नाव असून लंडनमध्ये हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलाय. प्राईम टिव्ही या चॅनेलसाठी शाहरुख हा कार्यक्रम करतोय. गेल्या दहा वर्षापासून या चॅनेलचे युरोपातील पाकिस्तानी जनतेसाठी 24 तास प्रक्षेपण सुरु करण्यात आलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2010 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close