S M L

'साद सह्याद्रीची' कार्यक्रमाला कोल्हापूरकरांची गर्दी

31 ऑक्टोबर, कोल्हापूर -प्रताप नाईक ऐतिहासिक वास्तूंची जपणूक करावी, हा संदेश देण्यासाठी दिवाळी या सणाचाही कल्पकतेने वापर करण्यात येत आहे. याचा प्रत्यय आला तो किल्ले पन्हाळागडावर. कोल्हापूरच्या 'सह्याद्री प्रतिष्ठान' या संस्थेतर्फे 'साद सह्याद्रची' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ऐतिहासिक वास्तूंची जपणूक करावी हा संदेश मिळालाच; पण इतिहास जागवण्याचा अनोखा प्रयोग केला गेला.दिव्यांनी उजळलेला पन्हाळा, सोबत वाजणारा डफ आणि शौर्याची गाथा सांगणारे शाहीर... असं वातावरण पन्हाळ्यावर होतं. 'काळाच्या जबड्यात घालुनी हात, मोजती ही जात ही आमुची. पहा चाळुनी पाने आमच्या इतिहासाची...' हा पोवाडा शाहिरांनी डफावर ताल धरत म्हटला नि हळुहळु या पोवाड्यांतून गड -किल्ल्यांचा इतिहास उलगडत केला. फक्त कोल्हापूरकरांनीच नाही तर तिथल्या पर्यटकांनीही तहान-भूक विसरून 'साद सह्याद्रीची' या कार्यक्रमात उत्साहानं भाग घेतला होता. 'सह्याद्री प्रतिष्ठान'चे कार्यकर्ते गेली 10 वर्षं ऐतिहासिक वास्तूंची जपणूक करण्यासाठी निरनिराळ्या उपक्रमांचं आयोजन करत आहेत. संस्थेचे कार्यकर्ते ते काम ते मोठ्या निष्ठेने करत आहेत. 'साद सह्याद्रची' हा कार्यक्रम 'सह्याद्री प्रतिष्ठान'च्या उपक्रमांचाच एक भाग आहे. ऐतिहासिक वास्तूंची जपणूक करावी, हा संदेश देण्यासाठी दिवाळीच्या सणाचाही या संस्थेनं कल्पतकेनं वापर केला. किल्हे पन्हाळागडावरची अंधारबाव ही वास्तु कार्यकर्त्यांनी दिव्यांनी उजळूत टाकली. 'हा कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं उद्देश आहे की, तरुण पिढीला इतिहासाविषयी आवड निर्माण व्हावी. म्हणून आम्ही अशा कार्यक्रमांचंआयोजन दरवर्षी करत असतो,' असं सह्याद्री प्रतिष्ठानचे सचीव प्रवीण उबाळे म्हणाले. प्रतिष्ठानच्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामुळं ही संस्था या कार्यक्रमाला आलेल्या पर्यटकांच्या कायमची आठवणीत राहणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2008 11:59 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2008 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close