S M L

लोकशाहीर विठ्ठल उमप यांना शोकाकूल वातावरणात निरोप

27 नोव्हेंबरलोकशाहीर विठ्ठल उमप यांच्यावर मुंबईत चैत्यभूमिवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे हजारो चाहते उपस्थित होते. शुक्रवारी नागपूरमध्ये बुद्ध टीव्ही वाहिनीच्या उद्घाटन कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यांनी रंगमंचावरच अखेरचा श्वास घेतला. स्टेजवर जय भीम म्हणतच त्यांनी आपला देह ठेवला. त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांचं पार्थिव विक्रोळीतील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे या नेत्यांनी विठ्ठल उमप यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2010 05:41 PM IST

लोकशाहीर विठ्ठल उमप यांना शोकाकूल वातावरणात निरोप

27 नोव्हेंबर

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्यावर मुंबईत चैत्यभूमिवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे हजारो चाहते उपस्थित होते. शुक्रवारी नागपूरमध्ये बुद्ध टीव्ही वाहिनीच्या उद्घाटन कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यांनी रंगमंचावरच अखेरचा श्वास घेतला. स्टेजवर जय भीम म्हणतच त्यांनी आपला देह ठेवला. त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांचं पार्थिव विक्रोळीतील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे या नेत्यांनी विठ्ठल उमप यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2010 05:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close