S M L

सोलापूरच्या बिरूदेवाला लोटला भाविकांचा जनसागर

31 ऑक्टोबर, सोलापूर सिद्धार्थ गोदाम विविध प्रथा आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जपणारे लोकउत्सव महाराष्ट्रात साजरे होतात. रांगड्या आणि मराठमोळ्या महाराष्ट्राची ओळख अशा उत्सवांमधूनच होते. मंगळवेढा इथे अशीच एक अनोखी यात्रा भरते. ती म्हणजे बिरूदेवाची. बिरूदेवाच्या या यात्रेसाठी यंदाही भाविकांचा जनसागर लोटला होता. मंगळवेढ्यापासून 20 किलोमीटरवर असणा-या हुलजती इथं बिरूदेवाचं प्राचीन मंदिर आहे. या बिरोबाच्या यात्रेत मुंडासे आणि भाकणुकीला विशेष महत्त्व असतं. बिरोबा म्हणजे महालिंगराय. त्याच्या या मंदिराच्या कळसाला साक्षात शंकर पार्वती मुंडासं गपचूप बांधून गेलेअशी आख्यायिका आहे. उत्सवाच्या दिवशी बिरूदेवाच्या कळसाला आपोआपच मुंडासं बांधलं जातं आणि तो दैवी चमत्कार पाहण्यासाठी नि धनगर समाजाच्या या दैवताच्या दर्शनासाठी दरवर्षी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून भाविक येतात.बिरूदेवाच्या या उत्सवाच्या निमित्ताने मंगळवेढ्यातल्या ओढ्याच्या काठी हुन्नरचा बिरोबा, जिराकलगीचा बिराप्पा, शिरढोणचा बिरोबा, सोन्याळचा विठ्ठलराया, खसगीचा बरगालसिध्द, उटगीचा ब्रह्मदेव,आणि हुलजतीचा महालिगराया या संतांच्या पालख्या येतात. यंदाही आल्या होत्या. छातीएवढ्या पाण्यातून भक्तांनी या संतांच्या पालख्या वाहून नेल्या. भंडारा उधळून, ढोल, नगारे वाजवून संतांची ही भेट साजरी झाली. असंख्य भाविक या सोहळ्याला आले होते. 'देवाला आटोमॅटीक फेटा बांधला जातो.सर्व धर्माचे लोक ते बघायला येतात. रात्री बाराला ध्वज लागतो. त्यानंतर भाकणूक होते,' अशी माहिती भाविक देवप्पा चकरागळे यांनी दिली. बिरूदेवाच्या पालखीसाठी ते खास कर्नाटकहून आले होते. मंदिरात मोठ्या भक्तीभावानं सुंबरान मांडलं गेलं. आणि त्यानंतर भाकणुकीचा कार्यक्रम झाला. धनगर समाजासोबतच सर्व जातीधर्माच्या लोकांनी या यात्रेला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2008 12:31 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2008 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close