S M L

गिरगावातील खोताच्या वाडीतला 75 वर्षांचा दीपोत्सव

31 ऑक्टोबर, मुंबई शची मराठे दिवाळी म्हणजे सगळ्या नातेवाईक आणि मित्र मंडळींनी एकत्र येऊन साजरा करण्याचा सण. असाच अनोखा दीपोत्सव साजरा गिरगावातील खोताच्या वाडीत साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे दिपोत्सव सुरू करावा अशी कल्पना मंगेश राणे आणि त्यांच्या मित्रांना सुचली आणि 1934 साली पहिला दीपोत्सव साजरा झाला. यंदाचं या दीपोत्सवाचं 75 वं वर्षं आहे. गिरगावच्या खोताच्या वाडीत गेल्यावर आपण गोव्याला तर आलो नाही ना असं नक्की वाटतं. कारण टुमदार बंगले, शांतता या वाडीची खास वैशिष्ट्यं . मात्र दिवाळीच्या संध्याकाळी इथं माहोल असतो दीपोत्सवाचा. सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे दिपोत्सव सुरू करावा अशी कल्पना मंगेश राणे आणि त्यांच्या मित्रांना सुचली आणि 1934 साली पहिला दीपोत्सव साजरा झाला. या दीपोत्सवात ऑर्केस्ट्रा, नाटकं आणि स्थानिक कार्यक्रमांची रेलचेल असते. खोताच्या वाडीतील 650 घरं आणि त्या घरांतली 2700 माणसं हा दीपोत्सव साजरा करत आहे. या दीपोत्सवासाठी उत्साही कार्यकर्त्यांची तिसरी पिढी उत्साहाने काम करत आहे. 'मनासारखं काम आणि निर्णयाचं स्वातंत्र्य मिळत असल्यानं तरूण पिढीदेखील या उत्सवात सामिल आहे,' असं अभिषेक शिर्केसारख्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच दिवाळीत सगळी खोताची वाडी दंग आहे दीपोत्सवाच्या धामधुमीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 31, 2008 12:40 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2008 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close