S M L

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सव

1 नोव्हेंबर, औरंगाबाद शिक्षणाचं मूळ आणि मुख्य उद्देश माणसाला स्वत:ची, निसर्गाची, समाजाची शास्त्रशुद्ध ओळख करुन देतं. साक्षरचं नव्हे तर सुजाण आणि सुस्कृंत बनवुन विद्यार्थ्यांना व्यापक समाजात पाठवण्याचं काम गेल्या 50 वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठवाड्यात करत आहे. 2 नोव्हेंबरला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची सांगता होत आहे. 23 आँगस्ट 1958 ला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते मराठवाडा विद्यापीठाचं उद्घाटन झालं होतं. 14 जानेवारी 1994 ला मराठवाडा विद्यापीठाचं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठं असं नामांतर करण्यात आलं. विद्यापीठात 37 विभाग असून औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्हयातल्या 275 महाविद्यालयातील दीड लाख विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेतात. सन 2004 ला विद्यापीठाचं उस्मानाबाद इथे उपकेंद्र सुरू झालं आहे.राज्यातील ग्रामीण शेतकरी , शेतमजुर, मागासवर्गीय घटकांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न 50 वर्षांत या विद्यापीठानं यशस्वीपणे केला आहे. चार लाखांपेक्षा जास्त ग्रंथ असणारी विद्यापीठाची लायब्ररी आहे. जी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं देते.आर्थिकदृष्टया मागास असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना या विद्यापीठानं दिल्या आहेत. आता या विद्यापीठाची दोन विद्यापीठं झाली आहेत. नांदेडला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठं स्थापनं करण्यात आलं आहे. मराठवाडाच्या शैक्षणिक विकासात या विद्यापीठाचं योगदान महत्त्वाचं ठरलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2008 08:38 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2008 08:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close