S M L

विरोधकांसोबत मतभेद आहेत पण मनभेद नाहीत - मुंडे

12 डिसेंबरविलासराव देशमुख, छगन भुजबळ आणि मी कधीही पार्टी सोडणार नाही. माझा हा कार्यक्रम राजकारणातली अस्पृश्यता संपवेल, असं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं आहे. मुंडे यांचा आज 61 वा वाढदिवस आहे. त्यांच्या एकसष्टीनिमित्त मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपाध्यक्ष नितीन गडकरी, विलासराव देशमुख, छगन भुजबळ या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुंडे, विलासराव देशमुख आणि छगन भुजबळ यांच्या भाषणांनी कार्यक्रमात रंगत आणली. भाजपच्या एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडेंबरोबरच, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील तसेच राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित आहेत. तसेच प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. तात्याराव लहानेही आवर्जून उपस्थित आहेत. पण विशेष म्हणजे भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाही. सेनेच्या बहुतांश नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलेली दिसते.'मुंडे तुम्ही कधी 'राव' लावू नका' - भुजबळछगन भुजबळांनी आपल्या भाषणात गोपीनाथ मुंडेंना सल्ला देत आपल्या आठवणींना उजाळा ही दिला. भुजबळ म्हणाले की, मुंडे तुम्ही कधी 'राव' लावू नका मुंडे आता राजकारणात तरूण झाले, साठीनंतर राजकारणात तरूण होतात. 1992 मध्ये विरोधी पक्ष नेते हे माझ्यामुळे झाले मी सेना सोडली नसती तर मुंडे विरोधी पक्ष झाले नसते. विरोधी पक्षनेता कसा हे त्यांनी दाखवून दिले- देशमुखकेंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख म्हणाले की, मी मुख्यमंत्री असतांना मित्रम्हणून मला ही सवलत होती की उद्या काय होणार आहे ते आज रात्री कळायचे, विरोधी पक्षनेता कसा हे त्यांनी दाखवून दिले आहे. विलासराव देशमुख लोकांना पटो न पटो पण गडकरी आपले विचार मांडतात. मुंडेंना सर्व आरामात चाललं असं ही काही नाही, त्यांच्या समोर अनेक अडचणी आहेत. विलासराव देशमुख यांचं भाषण शेजार धर्मामुळे आम्ही दोघंही निवडून येतो. मुंडेंच्या विरोधीपक्षासाठी कमी पडलेली माणसं मी आणली होती. त्यामुळे माझाही हातभार होता केवळ भुजबळांचा नाही. भविष्यातही ते विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडतील. मुख्यमंत्रीपद हे लहान सहान आहे, मी विरोधी पक्षनेत्यासाठीच जन्माला आलो. भविष्यात मुंडेंना लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपद मिळावं अशा मी शुभेच्छा देतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2010 11:09 AM IST

विरोधकांसोबत मतभेद आहेत पण मनभेद नाहीत - मुंडे

12 डिसेंबर

विलासराव देशमुख, छगन भुजबळ आणि मी कधीही पार्टी सोडणार नाही. माझा हा कार्यक्रम राजकारणातली अस्पृश्यता संपवेल, असं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलं आहे. मुंडे यांचा आज 61 वा वाढदिवस आहे. त्यांच्या एकसष्टीनिमित्त मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपाध्यक्ष नितीन गडकरी, विलासराव देशमुख, छगन भुजबळ या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुंडे, विलासराव देशमुख आणि छगन भुजबळ यांच्या भाषणांनी कार्यक्रमात रंगत आणली. भाजपच्या एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडेंबरोबरच, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील तसेच राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित आहेत. तसेच प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. तात्याराव लहानेही आवर्जून उपस्थित आहेत. पण विशेष म्हणजे भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाही. सेनेच्या बहुतांश नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवलेली दिसते.

'मुंडे तुम्ही कधी 'राव' लावू नका' - भुजबळ

छगन भुजबळांनी आपल्या भाषणात गोपीनाथ मुंडेंना सल्ला देत आपल्या आठवणींना उजाळा ही दिला. भुजबळ म्हणाले की, मुंडे तुम्ही कधी 'राव' लावू नका मुंडे आता राजकारणात तरूण झाले, साठीनंतर राजकारणात तरूण होतात. 1992 मध्ये विरोधी पक्ष नेते हे माझ्यामुळे झाले मी सेना सोडली नसती तर मुंडे विरोधी पक्ष झाले नसते.

विरोधी पक्षनेता कसा हे त्यांनी दाखवून दिले- देशमुख

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख म्हणाले की, मी मुख्यमंत्री असतांना मित्रम्हणून मला ही सवलत होती की उद्या काय होणार आहे ते आज रात्री कळायचे, विरोधी पक्षनेता कसा हे त्यांनी दाखवून दिले आहे. विलासराव देशमुख लोकांना पटो न पटो पण गडकरी आपले विचार मांडतात.

मुंडेंना सर्व आरामात चाललं असं ही काही नाही, त्यांच्या समोर अनेक अडचणी आहेत. विलासराव देशमुख यांचं भाषण शेजार धर्मामुळे आम्ही दोघंही निवडून येतो. मुंडेंच्या विरोधीपक्षासाठी कमी पडलेली माणसं मी आणली होती. त्यामुळे माझाही हातभार होता केवळ भुजबळांचा नाही. भविष्यातही ते विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडतील. मुख्यमंत्रीपद हे लहान सहान आहे, मी विरोधी पक्षनेत्यासाठीच जन्माला आलो. भविष्यात मुंडेंना लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपद मिळावं अशा मी शुभेच्छा देतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2010 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close