S M L

सवाई गंधर्व महोत्सवाची सुरमई सांगता

13 डिसेंबरसवाई गंधर्व महोत्सवाची काल उत्साहात सांगता झाली. या कार्यक्रमात वत्सलाबाई जोशी सन्मान माधव गुडी यांना प्रदान करण्यात आला. यानंतर पंडित उपेंद्र भट यांच्या गायनानी रंगत आणली. गुरु माधव गुडी यांच्या समोर गायला मिळाल्यामुळे आनंद झाल्याची भावना यावेळी भट यांनी व्यक्त केली. कलेच्या वेगवेगळ्या प्रकारांचा आविष्कार सवाई गंधर्व महोत्सवात पहायला मिळतो. काल सवाई मध्ये कथ्थकची अदाकारी रंगली. पंडित बिरजू महाराजांची मुलं आणि शिष्य पंडित दिपक महाराज आणि ममता महाराज यांनी कथ्थक नृत्य सादर केलं. पढंत, जुगलबंदी, धमार मधल्या रचना आणि चौगलबंदीनं संपुर्ण महोत्सवात रंगत आणली. रसिकांनीही भरभरुन दाद दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2010 12:23 PM IST

सवाई गंधर्व महोत्सवाची सुरमई सांगता

13 डिसेंबर

सवाई गंधर्व महोत्सवाची काल उत्साहात सांगता झाली. या कार्यक्रमात वत्सलाबाई जोशी सन्मान माधव गुडी यांना प्रदान करण्यात आला. यानंतर पंडित उपेंद्र भट यांच्या गायनानी रंगत आणली. गुरु माधव गुडी यांच्या समोर गायला मिळाल्यामुळे आनंद झाल्याची भावना यावेळी भट यांनी व्यक्त केली.

कलेच्या वेगवेगळ्या प्रकारांचा आविष्कार सवाई गंधर्व महोत्सवात पहायला मिळतो. काल सवाई मध्ये कथ्थकची अदाकारी रंगली. पंडित बिरजू महाराजांची मुलं आणि शिष्य पंडित दिपक महाराज आणि ममता महाराज यांनी कथ्थक नृत्य सादर केलं. पढंत, जुगलबंदी, धमार मधल्या रचना आणि चौगलबंदीनं संपुर्ण महोत्सवात रंगत आणली. रसिकांनीही भरभरुन दाद दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2010 12:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close