S M L

पुण्यातल्या एनएफएचे संचालक विजय जाधव यांचे निधन

13 डिसेंबरपुण्यातल्या नॅशनल फिल्म्स ऍण्ड अर्काईव्हचे संचालक विजय जाधव यांचे आज सकाळी हार्टऍटॅकनं निधन झालं. ते 43 वर्षांचे होते. प्रेस इन्फरमेशन ब्युरोचे जॉईंट डिरेक्टर म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर नॅशनल फिल्म अर्काईव्हचे इन्स्टिट्युटचे संचालक म्हणून त्यांनी तीन वर्षांपूर्वी कार्यभार स्वीकारला होता. एनएफएआयच्या कामात त्यांनी आपला ठसा उमटवला होता. अनेक दुर्मिळ चित्रपटांच्या रिस्टोरेशनचे काम त्यांनी पूर्ण केले होते. चित्रपटांचे डिजिटायजेशन करुन त्याचे जतन करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्याबरोबरच दर्जेदार चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिल्म फेस्टिव्हल्ससारख्या कार्यक्रमांना त्यांनी प्रोत्साहन दिले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2010 08:22 AM IST

पुण्यातल्या एनएफएचे संचालक विजय जाधव यांचे निधन

13 डिसेंबर

पुण्यातल्या नॅशनल फिल्म्स ऍण्ड अर्काईव्हचे संचालक विजय जाधव यांचे आज सकाळी हार्टऍटॅकनं निधन झालं. ते 43 वर्षांचे होते. प्रेस इन्फरमेशन ब्युरोचे जॉईंट डिरेक्टर म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर नॅशनल फिल्म अर्काईव्हचे इन्स्टिट्युटचे संचालक म्हणून त्यांनी तीन वर्षांपूर्वी कार्यभार स्वीकारला होता. एनएफएआयच्या कामात त्यांनी आपला ठसा उमटवला होता. अनेक दुर्मिळ चित्रपटांच्या रिस्टोरेशनचे काम त्यांनी पूर्ण केले होते. चित्रपटांचे डिजिटायजेशन करुन त्याचे जतन करण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्याबरोबरच दर्जेदार चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिल्म फेस्टिव्हल्ससारख्या कार्यक्रमांना त्यांनी प्रोत्साहन दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2010 08:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close