S M L

नसीर आणि शबानाजी 'ओनारीस कोसा' पदवीने सन्मानीत

1 नोव्हेंबर, नवी दिल्ली -सुशांत मेहतानसिरुद्दीन शहा आणि शबाना आझमी यांना दिल्लीच्या जमालिया इस्लामिया या विद्यापीठानं डॉक्टरेट देऊन सन्मानित केलं आहे. समाजातल्या त्यांच्या भरीव योगदानाबद्दल जमालिया इस्लामिया विद्यापीठाने दोघांचा 'ओनरीस कोसा' ही डॉक्टरेट पदवी देऊन गौरव केला. पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमाला नसीर आणि शबानाजी दोघंही उपस्थित होते. त्यावेळी शबानाजी जितक्या उत्सुक दिसल्या तितकी उत्सुकता नसीरजींमध्ये दिसली नाही. तर ते प्रचंड शांत आणि संयमी दिसले. ''ओनारीस कोसा' या पदवीनं माझा जो सन्मान केला आहे, त्याबद्दल मी विद्यापीठाची आभारी आहे,' अशा शब्दात शबानाजींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 'यापुढे डॉक्टर शबानी आज्मी म्हणून बोलवल जावं,'असा हट्टच शबानाजींनी यावेळी केला. पण नसीरजी मात्र यात विशेष इंटरेस्टेड नव्हते. विद्यापीठाचे आभार मानत 'मी जर डॉक्टर असतो तर समाजासाठी याहीपेक्षा अधिक खूप काही गोष्टी केल्या असत्या,' अशा कोरड्या शब्दांत नसीरजींनी प्रतिक्रिया दिली. मीडियासॅव्ही शबानाजींनी त्यांना स्वत:ला आणि नसीरजींना अशाप्रकारे गौरवलं जाणं हा नक्कीच योगायोग नसल्याचं सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 1, 2008 10:15 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2008 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close