S M L

मंत्र्यांना आचारसंहिता लागू होणार

24 डिसेंबरकेंद्रीय मंत्र्यांप्रमाणे आता मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या सर्व मंत्र्यांना आपली तसेच कुटुंबातील सदस्यांची संपत्ती आणि संपत्तीच्या स्त्रोतांची सविस्तर माहिती सरकार दरबारी जमा करावी लागणार आहे.अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना पत्र लिहून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आचारसंहितेनुसार संपत्तीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या सर्व मंत्र्यांना आपली आणि कुटुंबातील सदस्यांची संपत्ती, जबाबदारी आणि व्यावसायिक हितसंबंधाविषयीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी लागणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दोन महिन्यांच्या आत मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. आचारसंहितेचे पालन न करणार्‍या मंत्र्यांवर कारवाई करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असणार आहे.मंत्र्यांसाठी जारी केलेल्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आचारसंहितेतील मुद्दे 1. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दोन महिन्यांच्या आत मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना आपल्या कुटुंबाच्या संपत्ती आणि व्यावसायिक हितसंबंधांची सविस्तर माहिती असलेले प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. त्यात मंत्र्यांकडे असलेले शेअर्स, रोकड आणि जडजवाहिर यांचे एकूण अंदाजित मूल्य किती याचा आकडा नमूद करावा लागणार आहे.2. कोणत्याही व्यवसायाशी असलेले हितसंबंध तोडावे लागणार आहेत, तसेच त्यातून स्वत:चा मालकी अधिकार काढून घ्यावा लागणार आहे. मात्र हे हक्क कुटुंबातील प्रौढ व्यक्ति अगर नातलगाकडे हस्तांतरीत करता येणार आहे.3. मंत्र्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याला राजकारणासाठी, धर्मदायासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी देणगी स्विकारता येणार नाही. 4. मंत्र्यांना जवळच्या नातेवाईकाशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तिकडून भेटवस्तू स्विकारता येणार नाही. 5. सरकारी दौर्‍यावर असताना मंत्र्यांनी स्वत:च्या घरात किंवा शासकीय किंवा निमशासकीय विश्रामगृह किंवा मान्यताप्रात्प हॉटेलमध्येच मुक्काम करावा.6. मंत्र्यांनी भपकेबाज आणि महागड्या भेटवस्तू वाटल्या जाणार्‍या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे शक्यतो टाळावे मंत्र्यांची आचारसंहिता- संपत्तीचे तपशील दोन महिन्यांत द्यावेत- मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना द्यावा लागणार तपशील- कुटुंबाची संपत्ती, व्यावसायिक हितसंबंधाच्या माहितीचं प्रतिज्ञापत्र- कोणत्याही व्यवसायाशी हितसंबंध तोडावे लागतील- व्यवसायातून स्वत:ची मालकी काढून घ्यावी लागेल- व्यावसायिक मालकी हक्क पत्नी किंवा मुलांकडे देता येणार नाही- व्यावसायिक हक्क कुटुंबातल्या प्रौढ व्यक्तींकडे हस्तांतरीत करता येतील- राजकीय, धार्मिक किंवा इतर कारणासाठी देणगी स्वीकारता येणार नाही- जवळच्या नातेवाईकांशिवाय कोणाकडूनही भेटवस्तू स्वीकारू नये- सरकारी दौर्‍यावर असताना सरकारी-निमसरकारी विश्रामगृहातच मुक्काम करावा

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 24, 2010 02:15 PM IST

मंत्र्यांना आचारसंहिता लागू होणार

24 डिसेंबर

केंद्रीय मंत्र्यांप्रमाणे आता मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या सर्व मंत्र्यांना आपली तसेच कुटुंबातील सदस्यांची संपत्ती आणि संपत्तीच्या स्त्रोतांची सविस्तर माहिती सरकार दरबारी जमा करावी लागणार आहे.अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना पत्र लिहून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आचारसंहितेनुसार संपत्तीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या सर्व मंत्र्यांना आपली आणि कुटुंबातील सदस्यांची संपत्ती, जबाबदारी आणि व्यावसायिक हितसंबंधाविषयीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी लागणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दोन महिन्यांच्या आत मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. आचारसंहितेचे पालन न करणार्‍या मंत्र्यांवर कारवाई करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असणार आहे.

मंत्र्यांसाठी जारी केलेल्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आचारसंहितेतील मुद्दे

1. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दोन महिन्यांच्या आत मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना आपल्या कुटुंबाच्या संपत्ती आणि व्यावसायिक हितसंबंधांची सविस्तर माहिती असलेले प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. त्यात मंत्र्यांकडे असलेले शेअर्स, रोकड आणि जडजवाहिर यांचे एकूण अंदाजित मूल्य किती याचा आकडा नमूद करावा लागणार आहे.2. कोणत्याही व्यवसायाशी असलेले हितसंबंध तोडावे लागणार आहेत, तसेच त्यातून स्वत:चा मालकी अधिकार काढून घ्यावा लागणार आहे. मात्र हे हक्क कुटुंबातील प्रौढ व्यक्ति अगर नातलगाकडे हस्तांतरीत करता येणार आहे.3. मंत्र्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याला राजकारणासाठी, धर्मदायासाठी किंवा कोणत्याही कारणासाठी देणगी स्विकारता येणार नाही. 4. मंत्र्यांना जवळच्या नातेवाईकाशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तिकडून भेटवस्तू स्विकारता येणार नाही. 5. सरकारी दौर्‍यावर असताना मंत्र्यांनी स्वत:च्या घरात किंवा शासकीय किंवा निमशासकीय विश्रामगृह किंवा मान्यताप्रात्प हॉटेलमध्येच मुक्काम करावा.6. मंत्र्यांनी भपकेबाज आणि महागड्या भेटवस्तू वाटल्या जाणार्‍या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे शक्यतो टाळावे

मंत्र्यांची आचारसंहिता

- संपत्तीचे तपशील दोन महिन्यांत द्यावेत- मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना द्यावा लागणार तपशील- कुटुंबाची संपत्ती, व्यावसायिक हितसंबंधाच्या माहितीचं प्रतिज्ञापत्र- कोणत्याही व्यवसायाशी हितसंबंध तोडावे लागतील- व्यवसायातून स्वत:ची मालकी काढून घ्यावी लागेल- व्यावसायिक मालकी हक्क पत्नी किंवा मुलांकडे देता येणार नाही- व्यावसायिक हक्क कुटुंबातल्या प्रौढ व्यक्तींकडे हस्तांतरीत करता येतील- राजकीय, धार्मिक किंवा इतर कारणासाठी देणगी स्वीकारता येणार नाही- जवळच्या नातेवाईकांशिवाय कोणाकडूनही भेटवस्तू स्वीकारू नये- सरकारी दौर्‍यावर असताना सरकारी-निमसरकारी विश्रामगृहातच मुक्काम करावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2010 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close