S M L

ठाण्यात साहित्यिकांच्या मेळयाला प्रारंभ

25 डिसेंबर84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ध्वजारोहण करुन उद्घाटन करण्यात आले. उद्योजक संजय गायकवाड यांनी उद्घाटक म्हणून येण्यास नकार दिला. त्यामुळे नेहमीच्या परंपरेला फाटा देत, उद्घाटका ऐवजी यावेळी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्याबरोबर मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. द.भि. कुलकर्णी उपस्थित होते. नारायण सुर्वे सभामंडपात थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. दरम्यान आज दिवसभरात 3 परिसंवाद, काव्य संमेलन, ऑडिओ-व्हिजुअल कार्यक्रमाबरोबरच चित्रपट समीक्षेचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठी अभिमान गीतानं सुरुवात84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिमाखात सुरुवात झाली. यावेळी मराठी अभिमान गीत सादर करण्यात आले. या गीताने भारावलेल्या वातावरणातच संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2010 06:04 AM IST

ठाण्यात साहित्यिकांच्या मेळयाला प्रारंभ

25 डिसेंबर

84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ध्वजारोहण करुन उद्घाटन करण्यात आले. उद्योजक संजय गायकवाड यांनी उद्घाटक म्हणून येण्यास नकार दिला. त्यामुळे नेहमीच्या परंपरेला फाटा देत, उद्घाटका ऐवजी यावेळी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्याबरोबर मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. द.भि. कुलकर्णी उपस्थित होते. नारायण सुर्वे सभामंडपात थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. दरम्यान आज दिवसभरात 3 परिसंवाद, काव्य संमेलन, ऑडिओ-व्हिजुअल कार्यक्रमाबरोबरच चित्रपट समीक्षेचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मराठी अभिमान गीतानं सुरुवात

84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिमाखात सुरुवात झाली. यावेळी मराठी अभिमान गीत सादर करण्यात आले. या गीताने भारावलेल्या वातावरणातच संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2010 06:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close