S M L

साहित्य संमेलनाचा वापर समाजात दुही पसरवण्यासाठी नको - मुख्यमंत्री

27 डिसेंबरगेले तीन दिवस सुरू असलेल्या ठाण्यातल्या 84 व्या साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला. संमेलनाची सुरुवातच वादानं झाली होती. त्याचे सावट या संमेलनावर शेवटच्या दिवसापर्यंत राहिलं. स्मरणिकेत नथुराम गोडसेचा गौरव करून वाद निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयोजकांना चांगलंच फटकारले. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे कशासाठी वापरावे याचा विचार व्हायला हवा होता. वादाचे मुद्दे का उपस्थित झाले असा सवाल त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला. तसेच मी एक मराठीचा उपासक आहे असं सांगतानाच ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाची पुन्हा निर्मिती व्हावी अशी आशा व्यक्त केली. मराठीसाठी प्रयत्न करणार्‍या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला राज्य सरकारने पाठिंबा द्यावा असं स्पष्ट मत अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आपल्या भाषणात मांडले. ठाणे जिल्ह्यातल्याच डोंबिवलीतही साहित्याची उपासना करणारे लोक राहतात हे विसरून चालणार नाही असं म्हणतच शं ना नवरे यानी आयोजन समितीवर हल्ला चढवला. संमेलनाच्या मुख्य मंडपात शुद्धलेखनासंबंधी चुका केल्याचे सांगत त्यांनी आयोजन समितीतल्या मराठी प्रेमाचे आणि शुद्धलेखनाच्या आस्थेचे वाभाडे काढले. यावेळी ज्येष्ठ कवी शंकर वैद्य, ज्येष्ठ लेखक शं. ना. नवरे, ग्रंथप्रसाराचे काम करणारे शामसुंदर जोशी यांचा सत्कार मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी मुलांनी ठाणे अभिमान गीत गाऊन कार्यक्रमात रंगत भरली.संमेलनाचा एक दिवस रविवार असल्याने पुस्तक विक्रीच्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली. यात तरुणांचा वाटा मोठा होता. तीन दिवसांमध्ये शालेय मुलांना साहित्याकडे आकर्षित करण्यासाठी बालमेळावे घेण्यात आले. ऐतिहासिक धार्मिक, आहारविषयक, माहिती तंत्रज्ञान या पुस्तकांना अधिक मागणी होती. संमेलनाच्या दोन दिवसांत विश्वास पाटील यांच्या पानीपत या कादंबरीच्या 1 हजार प्रती विकल्या गेल्या. तसेच या तीन दिवसांच्या काळात ग्रंथप्रदर्शानाच्या व्यासपीठावर 120 नव्या पुस्तकांचे प्रकाशन झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2010 03:06 PM IST

साहित्य संमेलनाचा वापर समाजात दुही पसरवण्यासाठी नको - मुख्यमंत्री

27 डिसेंबर

गेले तीन दिवस सुरू असलेल्या ठाण्यातल्या 84 व्या साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला. संमेलनाची सुरुवातच वादानं झाली होती. त्याचे सावट या संमेलनावर शेवटच्या दिवसापर्यंत राहिलं. स्मरणिकेत नथुराम गोडसेचा गौरव करून वाद निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आयोजकांना चांगलंच फटकारले. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे कशासाठी वापरावे याचा विचार व्हायला हवा होता. वादाचे मुद्दे का उपस्थित झाले असा सवाल त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला.

तसेच मी एक मराठीचा उपासक आहे असं सांगतानाच ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाची पुन्हा निर्मिती व्हावी अशी आशा व्यक्त केली. मराठीसाठी प्रयत्न करणार्‍या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला राज्य सरकारने पाठिंबा द्यावा असं स्पष्ट मत अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी आपल्या भाषणात मांडले. ठाणे जिल्ह्यातल्याच डोंबिवलीतही साहित्याची उपासना करणारे लोक राहतात हे विसरून चालणार नाही असं म्हणतच शं ना नवरे यानी आयोजन समितीवर हल्ला चढवला. संमेलनाच्या मुख्य मंडपात शुद्धलेखनासंबंधी चुका केल्याचे सांगत त्यांनी आयोजन समितीतल्या मराठी प्रेमाचे आणि शुद्धलेखनाच्या आस्थेचे वाभाडे काढले. यावेळी ज्येष्ठ कवी शंकर वैद्य, ज्येष्ठ लेखक शं. ना. नवरे, ग्रंथप्रसाराचे काम करणारे शामसुंदर जोशी यांचा सत्कार मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी मुलांनी ठाणे अभिमान गीत गाऊन कार्यक्रमात रंगत भरली.

संमेलनाचा एक दिवस रविवार असल्याने पुस्तक विक्रीच्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली. यात तरुणांचा वाटा मोठा होता. तीन दिवसांमध्ये शालेय मुलांना साहित्याकडे आकर्षित करण्यासाठी बालमेळावे घेण्यात आले.

ऐतिहासिक धार्मिक, आहारविषयक, माहिती तंत्रज्ञान या पुस्तकांना अधिक मागणी होती. संमेलनाच्या दोन दिवसांत विश्वास पाटील यांच्या पानीपत या कादंबरीच्या 1 हजार प्रती विकल्या गेल्या. तसेच या तीन दिवसांच्या काळात ग्रंथप्रदर्शानाच्या व्यासपीठावर 120 नव्या पुस्तकांचे प्रकाशन झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2010 03:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close