S M L

माधव भंडारी यांनी आव्हाड यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला

02 जानेवारीभाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. आयबीएन सेव्हनच्या अजेंडा या कार्यक्रमात आव्हाड यांनी जेम्स लेनच्या पुस्तकात भंडारी यांचा उल्लेख असल्याचा दावा केला होता. त्यावरुन आता हा वाद सुरु झाला. आयबीएन सेव्हनच्या अजेंडा या कार्यक्रमात आव्हाड म्हणाले की, "और मै भंडारे साब को बताना चाहता हँू... माधव भंडारे को उन्होंने कहाँ है थँक्यू व्हेरी मच. "आव्हाडांच्या या वक्तव्याने भंडारी संतापले. आपल्यावर झालेला हा आरोप पक्षालाही राजकीयदृष्ट्या अडचणीत आणू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी कार्यक्रमातच हा आरोप खोडून काढायचा प्रयत्न केला."ये जो आरोप जीतेंद्र आव्हाड कर रहे है, एक तो इसका सबूत सामने लाना चाहीए नही तो जबाब देना पडेगा"भंडारी हा निव्वळ इशाराच देऊन थांबलेले नाहीत. त्यांनी आपल्या वकीलाच्या माध्यमातून आव्हाड यांना थेट कोर्टात खेचलं. भंडारी म्हणता की, "काही संबंधच नाही, आता आव्हाडांना हे सिद्ध करू द्या. माफी मागण्यापेक्षा न्यायालयात त्यांनी सिद्ध करणं गरजेचं आहे " दरम्यान, माधव भांडारी यांच्या नोटीशीचे उत्तर कोर्टात दिल्यानंतरच आपण याबद्दलची प्रतिक्रिया देऊ असं जितेंद्र आव्हाड यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2011 12:39 PM IST

माधव भंडारी यांनी आव्हाड यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला

02 जानेवारी

भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. आयबीएन सेव्हनच्या अजेंडा या कार्यक्रमात आव्हाड यांनी जेम्स लेनच्या पुस्तकात भंडारी यांचा उल्लेख असल्याचा दावा केला होता. त्यावरुन आता हा वाद सुरु झाला.

आयबीएन सेव्हनच्या अजेंडा या कार्यक्रमात आव्हाड म्हणाले की, "और मै भंडारे साब को बताना चाहता हँू... माधव भंडारे को उन्होंने कहाँ है थँक्यू व्हेरी मच. "आव्हाडांच्या या वक्तव्याने भंडारी संतापले. आपल्यावर झालेला हा आरोप पक्षालाही राजकीयदृष्ट्या अडचणीत आणू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी कार्यक्रमातच हा आरोप खोडून काढायचा प्रयत्न केला."ये जो आरोप जीतेंद्र आव्हाड कर रहे है, एक तो इसका सबूत सामने लाना चाहीए नही तो जबाब देना पडेगा"

भंडारी हा निव्वळ इशाराच देऊन थांबलेले नाहीत. त्यांनी आपल्या वकीलाच्या माध्यमातून आव्हाड यांना थेट कोर्टात खेचलं. भंडारी म्हणता की, "काही संबंधच नाही, आता आव्हाडांना हे सिद्ध करू द्या. माफी मागण्यापेक्षा न्यायालयात त्यांनी सिद्ध करणं गरजेचं आहे " दरम्यान, माधव भांडारी यांच्या नोटीशीचे उत्तर कोर्टात दिल्यानंतरच आपण याबद्दलची प्रतिक्रिया देऊ असं जितेंद्र आव्हाड यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2011 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close