S M L

उत्तरप्रदेशच्या 400 नागरिकांना हज यात्रेसाठी व्हिसा नाकारला

2 नोव्हेंबर, उत्तरप्रदेश मायावती आणि केंद्र सरकारमधला संघर्ष वाढतंच चालला आहे. यावेळी हज यात्रेवरुन मायावती यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. यंदा उत्तरप्रदेशातून जाणार्‍या 400 हज यात्रेकरुंना व्हिसा मिळू शकलेला नाही. व्हिसा आणि परवानगीचे कागदपत्रं योग्य नसल्यानं 400 जण हज यात्रेपासून वंचित राहिले आहेत.देशात सध्या सर्वत्र राजकारणाचीच चर्चा रंगलीय. त्यातच मुस्लिम मतं मिळवण्यासाठी सगळेच पक्ष करत आहेत. काँग्रेस आणि समाजवादी पक्षांना टार्गेट करुन आपणच मुस्लिम समाजाचे हितैषी असल्याचा दावा मायावती करत आहेत. अशातच उत्तरप्रदेशातून हज यात्रेसाठी जेद्दाहमध्ये जावू इच्छिणार्‍या 400 लोकांना व्हिसा नाकारण्यात आला आहे. पासपोर्ट आणि अन्य कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं हे लोक हजयात्रेपासून वंचित राहिले आहेत. मायावती यांना यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या कारभाराला दोषी ठरवलं आहे.हज यात्रा करणार्‍यांसाठी केंद्रानं एक कोटा निश्चित केला आहे. प्रत्येक राज्यासाठी विशिष्ट कोटा ठरवून देण्यात आलाय. त्यासाठी केंद्रीय हज समितीनं काही नियम निश्चित केले आहेत. पण राजकीय पक्षांच्या मर्जीखातर बर्‍याचदा या नियमात फेरफार केला जातो. मायावती आणि केंद्र सरकारमधला संघर्ष कोणालाच नवीन नाही. सुरुवातीला रेल कोच फॅक्टरी निमित्तानं आणि नंतर राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारुन मायावतींनी पर्यायानं काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न केला होता आणि आता हज यात्रेच्या निमित्तानं केंद्राला पुन्हा एकदा केंद्राला लक्ष्य करून मायावतींनी पुढची खेळी खेळल्याचं मानलं जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2008 07:30 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2008 07:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close