S M L

नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोपाखाली संपादक ढवळे यांना अटक

4 जानेवारीलेखक, पत्रकार आणि विद्रोही या मासिकाचे संपादक सुधीर ढवळे यांना गोंदिया पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला. पण नक्षलवाद्यांशी काहीही संबंध नसताना पोलीस ढवळे यांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. सुधीर ढवळे हे रिपब्लिकन पँथर जातीय अंताच्या चळवळीचे संस्थापक आहेत. फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत ते सक्रीय असतात. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागांत आदिवासींच्या सुरू असलेल्या चळवळीचे ते अभ्यासक आहेत. 2 जानेवारीला एक कार्यक्रम आटोपून परतत असताना वर्धा रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी त्यांना अटक केली. जातीय आतंक, विकास आतंक विरोधातील राज्यव्यापी परिषदेचा हा कार्यक्रम होता. त्यांच्यावर नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. यामुळे मुंबईतल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या अटकेचा निषेध म्हणून आज निदर्शनंही करण्यात येणार आहेत. कोण आहेत सुधीर ढवळे ?- विद्रोही मासिकचे संपादक- 'रिपब्लिकन पँथर जातीय अंत' चळवळीचे संस्थापक- आदिवासी चळवळीचे अभ्यासक- दलित पँथर्समार्फत आदिवासींवरील अन्यायाविरोधात आंदोलन- 'ऍट्रॉसिटी कायद्याची 20 वर्षं'- महाराष्ट्राचा 'सुवर्ण' महोत्सवया पुस्तकांचे लेखक- नव जागरण प्रकाशन संस्था

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2011 10:50 AM IST

नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोपाखाली संपादक ढवळे यांना अटक

4 जानेवारी

लेखक, पत्रकार आणि विद्रोही या मासिकाचे संपादक सुधीर ढवळे यांना गोंदिया पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला. पण नक्षलवाद्यांशी काहीही संबंध नसताना पोलीस ढवळे यांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. सुधीर ढवळे हे रिपब्लिकन पँथर जातीय अंताच्या चळवळीचे संस्थापक आहेत. फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत ते सक्रीय असतात. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागांत आदिवासींच्या सुरू असलेल्या चळवळीचे ते अभ्यासक आहेत. 2 जानेवारीला एक कार्यक्रम आटोपून परतत असताना वर्धा रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी त्यांना अटक केली. जातीय आतंक, विकास आतंक विरोधातील राज्यव्यापी परिषदेचा हा कार्यक्रम होता. त्यांच्यावर नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. यामुळे मुंबईतल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच या अटकेचा निषेध म्हणून आज निदर्शनंही करण्यात येणार आहेत.

कोण आहेत सुधीर ढवळे ?

- विद्रोही मासिकचे संपादक- 'रिपब्लिकन पँथर जातीय अंत' चळवळीचे संस्थापक- आदिवासी चळवळीचे अभ्यासक- दलित पँथर्समार्फत आदिवासींवरील अन्यायाविरोधात आंदोलन- 'ऍट्रॉसिटी कायद्याची 20 वर्षं'- महाराष्ट्राचा 'सुवर्ण' महोत्सवया पुस्तकांचे लेखक- नव जागरण प्रकाशन संस्था

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2011 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close