S M L

गिरणगाव महोत्सवात रंगला दशावताराचा सोहळा

2 नोव्हेंबर, गिरणगावशिल्पा गाडगिरणगाव म्हटल की आपल्याला आठवतात त्या केवळ चिमण्या आणि संप पण याच गिरणगावानं अनेक कलाही जोपासल्या.मुंबईत पुकार या संस्थेतर्फे सुरू असलेल्या गिरणगाव महोत्सवात अशा अनेक कलांचा रसिक आनंद घेत आहे. संध्याकाळी सहा वाजल्यापासून मुंबईतल्या नरे पार्क येथे रसिकांना हा कार्यक्रम विनामुल्य पहायला मिऴेल.चेहर्‍यावरची रंगरंगोटी, भरजरी वस्त्र, दागिने आणि क्षणात पालटणारं हे रुप आहे दशावतारचं. 25 वर्षांपूर्वी मुंबईतल्या गिरणगावात हमखास पहायला मिळणारा हा कलाप्रकार आज पुन्हा पहायला मिऴाला पुकारच्या ' गिरणमहोत्सवात. ' आणि ही परंपरा मुंबईत रुजवणार्‍या गिरणगावच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. दशावतारासारख्या अनेक कला या गिरणगावानं रुजवल्या वाढवल्या आणि फुलवल्या. त्यातलाच एक कलाप्रकार म्हणजे नमन. जगण्याच्या रोजच्या लढाईतही गिरणगावानं हा उत्सवी बाज जपला . गिरणगावाचं या सगळ्या कलाप्रकारांशी असणारं नातं म्हणजे माणसाचं कलेशी असणारं नातं. ' गिरणगावाचं आणि नमनाचं एक नातं होतं. ते नात यातून दृढ झालं ' , अशी प्रतिक्रिया नमन सादर करणार्‍या कलाकारांनी दिली. या गिरणगावानं मुंबईला जशी आर्थिक सुबत्ता दिली तसंच दिलं सांस्कृतिक वैभवही ! या महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा गिरणगावच्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला आहे. मध्यंतरी खंडीत झालेली लोककलांची परंपरा या उत्सवानिमित्त परत एकदा चालू न्हावी अशीच इच्छा इथल्या प्रत्येक नागरिकांची असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2008 09:03 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2008 09:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close