S M L

डॉ. चेतन चिटणीस यांना इन्फोसिस पुरस्कारानं सन्मानित

07 जानेवारी प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ डॉ. चेतन चिटणीस यांना यंदाच्या इन्फोसिस पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी भारतात राहून मलेरियावर एक महत्त्वाचं संशोधन केलं आहे. त्यामुळं मलेरियाची लस तयार करणं शक्य झालं आहे. मुंबईत इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनच्या कार्यक्रमात गुरुवारी हा पुरस्कार पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते डॉ.चिटणीस यांना देण्यात आला.तसेच डॉ. चिटणीस यांच्यासह प्रोफेसर चंद्रशेखर खरे यांना गणिती विज्ञान तर प्रोफेसर अमिता बावीस्कर यांना समाजशास्त्रातील संशोधनासाठी इन्फोसिस पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. विशेष म्हणजे सहा पुरस्कार विजेत्यांमध्ये हे तिघं मराठी आहेत. दिल्लीच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर जिनेटीक इंजिनिअरिंग ऍण्ड बायो टेक्नॉलॉजी संस्थेत सध्या डॉ.चिटणीस मलेरियाची लस तयार करण्याचं काम करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2011 11:29 AM IST

डॉ. चेतन चिटणीस यांना इन्फोसिस पुरस्कारानं सन्मानित

07 जानेवारी

प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ डॉ. चेतन चिटणीस यांना यंदाच्या इन्फोसिस पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी भारतात राहून मलेरियावर एक महत्त्वाचं संशोधन केलं आहे. त्यामुळं मलेरियाची लस तयार करणं शक्य झालं आहे. मुंबईत इन्फोसिस सायन्स फाऊंडेशनच्या कार्यक्रमात गुरुवारी हा पुरस्कार पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते डॉ.चिटणीस यांना देण्यात आला.तसेच डॉ. चिटणीस यांच्यासह प्रोफेसर चंद्रशेखर खरे यांना गणिती विज्ञान तर प्रोफेसर अमिता बावीस्कर यांना समाजशास्त्रातील संशोधनासाठी इन्फोसिस पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. विशेष म्हणजे सहा पुरस्कार विजेत्यांमध्ये हे तिघं मराठी आहेत. दिल्लीच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर जिनेटीक इंजिनिअरिंग ऍण्ड बायो टेक्नॉलॉजी संस्थेत सध्या डॉ.चिटणीस मलेरियाची लस तयार करण्याचं काम करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2011 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close