S M L

जैन यांच्या विरोधात शिवसेनाप्रमुखांची भेट घेणार - मुनगंटीवार

11 जानेवारीखडसे विरूद्ध जैन यांच्या वादानं आता गंभीर वळण घेतलंय. एकनाथ खडसे यांच्याविरोधात सुरेश जैन यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. मुनगंटीवार नवी मुंबईतल्या उरण इथं बोलत होते. खडसे विरूद्ध जैन यांच्या वादावर मुनगंटीवार यांनी काल (सोमवारी) शिवसेनेनं आपल्या नेत्यांना आवर घालावा 2014च्या निवडणुकीवर याचा परिणाम होईल असा इशारा ही दिला होता. दरम्यान विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे विरु ध्द शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांच्यातलं शाब्दिक युध्द जोरदार रंगलयं. दोघांचेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.जळगाव जिल्ह्यामध्ये दोघेही जण एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नाहीयेत. मुक्ताईनगर या खडसेंच्या मतदार संघात सेनेनं 2 ठिकाणी आज मेळावे घेतले. तर त्याच वेळी खडसेंचेही स्वत:च्या मतदार संघात कार्यक्रम आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2011 10:29 AM IST

जैन यांच्या विरोधात शिवसेनाप्रमुखांची भेट घेणार - मुनगंटीवार

11 जानेवारी

खडसे विरूद्ध जैन यांच्या वादानं आता गंभीर वळण घेतलंय. एकनाथ खडसे यांच्याविरोधात सुरेश जैन यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. मुनगंटीवार नवी मुंबईतल्या उरण इथं बोलत होते. खडसे विरूद्ध जैन यांच्या वादावर मुनगंटीवार यांनी काल (सोमवारी) शिवसेनेनं आपल्या नेत्यांना आवर घालावा 2014च्या निवडणुकीवर याचा परिणाम होईल असा इशारा ही दिला होता.

दरम्यान विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे विरु ध्द शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांच्यातलं शाब्दिक युध्द जोरदार रंगलयं. दोघांचेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.जळगाव जिल्ह्यामध्ये दोघेही जण एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नाहीयेत. मुक्ताईनगर या खडसेंच्या मतदार संघात सेनेनं 2 ठिकाणी आज मेळावे घेतले. तर त्याच वेळी खडसेंचेही स्वत:च्या मतदार संघात कार्यक्रम आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2011 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close