S M L

दारु पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द - गृहमंत्री

15 जानेवारीदारु पिऊन गाडी चालवणार्‍यांनो सावधान कारण आता तुम्हांला नुसतं कारवाई किंवा दंडालाच सामोरं जावं लागणार नाही. तर आता लायसन्सच कायमचं रद्द केलं जाणार आहे. गृहमंत्री आर आर पाटील यांनी आज पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. पुण्यामध्ये आज रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. अशा स्वरुपाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच रस्त्यावर अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना मदत करणार्‍या व्यक्तींना आता चौकशीसाठी पोलिसांकडे खेटे मारावे लागणार नाहीत उलट राज्य स्तरावर त्यांना सन्मानित करण्याचं धोरण सरकार स्वीकारणार असल्याचंही यावेळी आर. आर. पाटील यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2011 02:13 PM IST

दारु पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द - गृहमंत्री

15 जानेवारी

दारु पिऊन गाडी चालवणार्‍यांनो सावधान कारण आता तुम्हांला नुसतं कारवाई किंवा दंडालाच सामोरं जावं लागणार नाही. तर आता लायसन्सच कायमचं रद्द केलं जाणार आहे. गृहमंत्री आर आर पाटील यांनी आज पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. पुण्यामध्ये आज रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. अशा स्वरुपाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच रस्त्यावर अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना मदत करणार्‍या व्यक्तींना आता चौकशीसाठी पोलिसांकडे खेटे मारावे लागणार नाहीत उलट राज्य स्तरावर त्यांना सन्मानित करण्याचं धोरण सरकार स्वीकारणार असल्याचंही यावेळी आर. आर. पाटील यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2011 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close