S M L

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचं निधन

24 जानेवारीस्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचं पुण्यात सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी दीर्घ आजारानं निधन झालं. दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ते 88 वर्षांचे होते. ख्यालगायकीचे अनभिषिक्त सम्राट, संतवाणीचे वारकरी अशी त्यांची ओळख होती. पंडित भीमसेन जोशी हे किराणा घराण्याचे गायक होते. रामभाऊ कुंदगोळ म्हणजेच सवाई गंधर्वांकडं 1936 साली त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांनी पहिला लाईव्ह कार्यक्रम केला होता. तर वयाच्या 22 व्या वर्षी त्यांचा पहिला अल्बम एचएमव्ही कंपनीनं बाजारात आणला.अभंगवाणीच्या माध्यमातून ते खर्‍या अर्थानं सर्वसामान्यांपर्यंत पोहचले. गुरुच्या स्मरणार्थ 1952 साली सुरु केलेला सवाई गंधर्व महोत्सव देशात एका लौकिकाला पात्र ठरला. अनेक संगीत महोत्सवांमध्ये सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला एक मानाचं स्थान आहे. पंडितजींनी शिष्यांवर अपार प्रेम केलं. पद्मश्रीपासून ते देशाचा सर्वोच्च सन्मान समजल्या जाणार्‍या भारतरत्न पर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. पुणे विद्यापीठ, कर्नाटक विद्यापीठ यांच्या डी. लिट या पदव्यांनीही भीमसेनजींना सन्मानित करण्यात आलं. दुपारी 2 वाजता पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित राहणार आहेत.स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशींच्या जीवनपटख्यालगायकीचा सम्राट, संतवाणीचा वारकरी. भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी....भारतीय संगीत क्षेत्र या नावाला आता पोरकं झालं आहे. पंडितजींचा जन्म 6 फेब्रुवारी 1922 साली कर्नाटकातल्या गदगचा. त्यांचे वडील शाळामास्तर होते. लहानपणापासून त्यांना गायनाची आवड होती. गाण्याच्या वेडापायी पंडितजी वयाच्या 11 व्या वर्षीच गाणं शिकण्यासाठी घरातून पळून गेले. कर्नाटकातून त्यांचा सुरु झालेला हा प्रवास पंजाब, ग्वाल्हेर, खडगपूर, कोलकाता, दिल्ली, जालंधर आणि पुणे, मुंबई असा झाला. ग्वाल्हेरमध्ये उस्ताद हफीज अली खाँ यांच्याकडे त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांनी त्यांना पुन्हा एकदा गावाकडे परत आणले. आणि त्यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरु झालं ते कुंदगोळच्या रामभाऊ कुंदगोळकर म्हणजेच सवाई गंधर्व यांच्याकडे. सवाई गंधर्व हेच त्यांचे गुरु. 1936 साली त्यांनी सवाई गंधर्वांकडे संगीताचं पुढचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. सवाई गंधर्वांकडे त्यांनी बरीच वर्ष ख्यालगायकीचे धडे गिरवले. त्यावेळी पंडितजींबरोबर त्यांच्या गुरुभगिनी गंगूबाई हनगलही तिथं शिकायला होत्या. पंडित भीमसेन जोशी हे किराणा घराण्याचे गायक. पण ते कधीच त्या परंपरेत अडकून राहिले नाहीत. काही राग एकत्र करुन त्यांनी त्यातून नव्या रागाला जन्माला घातलं. ते म्हणजे राग कलाश्री आणि ललितभटियार.वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांचा पहिला लाईव्ह परफॉर्मन्स झाला. तर वयाच्या 22 व्या वर्षी एचएमव्ही कंपनीनं त्यांचा पहिला अल्बम प्रकाशित केला. आपल्या गुरुच्या षठ्यब्दीपूर्ती निमित्त पुण्यात 1946 साली पंडित भीमसेन जोशींची पहिली जाहीर मैफिल झाली. शास्त्रीय संगीताबरोबरच पंडितजींनी नाट्यसंगीत, ठुमरी, भजन यातही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. जो भजे हरि को सदा हे त्यांचं भजन विशेष करुन गाजलं. माझे माहेर पंढरी, इंद्रायणी काठी, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या अभंगांबरोबरच त्यांचे इतर अनेक अभंग आजही अजरामर आहेत. एकादशी म्हटलं कुठल्याही गावातल्या विठ्ठल मंदिरात पंडितजींचा बहारदार आवाज ऐकायला येतोच. पंडितजींच्या संतवाणीनं खर्‍या अर्थानं सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेतला.आपल्या पहाडी आवाजातून विठ्ठलाचं नामस्मरण करणारा पंडितजींच्या व्यक्तिरेखेतला सूर हीच एक आठवण आता आपल्यासाठी उरली आहे. पंडितजींनी कन्नड, मराठी, हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्येही पार्श्वगायन केलं. 1985 साली त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कारही मिळाला. मैफलीच्या पहिल्या षड्जापासून भैरवीपर्यंत रसिकांना मन:पूर्वक गाणं ऐकवायचं, हा भीमसेनजींचा गानधर्म. आपले गुरु सवाई गंधर्व यांच्या स्मृती जागवण्यासाठी त्यांनी 1952 साली पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवाचं रोपटं लावलं. गेली 58 वर्ष अविरतपणे सुरु असलेल्या महोत्सवाचं आज कल्पवृक्षात रुपांतर झालं. एवढंच नाही तर पुण्याच्या विद्यापीठ रोडवर सवाई गंधर्वांच्या नावाचं स्मारकही त्यांनी उभारलं. भीमसेनजींच्या सन्मानार्थ पुणे विद्यापीठानं त्यांच्या नावानं एक अध्यासनही सुरु केलं. पद्मश्रीपासून ते भारतरत्नपर्यंत असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. ख्यालगायकीचे सम्राट असलेले पंडितजी उत्तम ड्रायव्हिंगही करायचे. त्यांच्याकडे असलेल्या मर्सिडिज गाडीवर त्यांचं विशेष प्रेम होतं.अत्यंत नेमक्या मोजक्या शब्दात आपल्या भावना व्यक्त करणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. भारतरत्न स्वीकारताना देखील पंडितजी म्हणाले होते भारतीय ख्याल गायन परंपरेत आजवर अनेक कलावंतांनी दिलेल्या योगदानाबद्दल मी हा पुरस्कार स्वीकारतोय ही त्यांची प्रतिक्रिया त्यांच्यातल्या विनम्रतेचं दर्शन घडवून गेली. माझ्या अंतिम स्वरामध्ये जीवनाच्या सर्व विभूती एकत्र याव्यात, गाणं हेच माझं जीवन सर्वस्व त्या ईश्वराच्या चरणी लीन व्हावं असं म्हणतच पंडितजी आज आपल्यातून निघून गेलेत. स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशींना आयबीएन लोकमतची भावपूर्ण श्रद्धांजली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2011 07:33 AM IST

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचं निधन

24 जानेवारीस्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचं पुण्यात सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी दीर्घ आजारानं निधन झालं. दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ते 88 वर्षांचे होते. ख्यालगायकीचे अनभिषिक्त सम्राट, संतवाणीचे वारकरी अशी त्यांची ओळख होती. पंडित भीमसेन जोशी हे किराणा घराण्याचे गायक होते. रामभाऊ कुंदगोळ म्हणजेच सवाई गंधर्वांकडं 1936 साली त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांनी पहिला लाईव्ह कार्यक्रम केला होता. तर वयाच्या 22 व्या वर्षी त्यांचा पहिला अल्बम एचएमव्ही कंपनीनं बाजारात आणला.अभंगवाणीच्या माध्यमातून ते खर्‍या अर्थानं सर्वसामान्यांपर्यंत पोहचले. गुरुच्या स्मरणार्थ 1952 साली सुरु केलेला सवाई गंधर्व महोत्सव देशात एका लौकिकाला पात्र ठरला. अनेक संगीत महोत्सवांमध्ये सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला एक मानाचं स्थान आहे. पंडितजींनी शिष्यांवर अपार प्रेम केलं. पद्मश्रीपासून ते देशाचा सर्वोच्च सन्मान समजल्या जाणार्‍या भारतरत्न पर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. पुणे विद्यापीठ, कर्नाटक विद्यापीठ यांच्या डी. लिट या पदव्यांनीही भीमसेनजींना सन्मानित करण्यात आलं. दुपारी 2 वाजता पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित राहणार आहेत.

स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशींच्या जीवनपट

ख्यालगायकीचा सम्राट, संतवाणीचा वारकरी. भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी....भारतीय संगीत क्षेत्र या नावाला आता पोरकं झालं आहे. पंडितजींचा जन्म 6 फेब्रुवारी 1922 साली कर्नाटकातल्या गदगचा. त्यांचे वडील शाळामास्तर होते. लहानपणापासून त्यांना गायनाची आवड होती. गाण्याच्या वेडापायी पंडितजी वयाच्या 11 व्या वर्षीच गाणं शिकण्यासाठी घरातून पळून गेले. कर्नाटकातून त्यांचा सुरु झालेला हा प्रवास पंजाब, ग्वाल्हेर, खडगपूर, कोलकाता, दिल्ली, जालंधर आणि पुणे, मुंबई असा झाला. ग्वाल्हेरमध्ये उस्ताद हफीज अली खाँ यांच्याकडे त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांनी त्यांना पुन्हा एकदा गावाकडे परत आणले. आणि त्यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरु झालं ते कुंदगोळच्या रामभाऊ कुंदगोळकर म्हणजेच सवाई गंधर्व यांच्याकडे. सवाई गंधर्व हेच त्यांचे गुरु. 1936 साली त्यांनी सवाई गंधर्वांकडे संगीताचं पुढचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. सवाई गंधर्वांकडे त्यांनी बरीच वर्ष ख्यालगायकीचे धडे गिरवले. त्यावेळी पंडितजींबरोबर त्यांच्या गुरुभगिनी गंगूबाई हनगलही तिथं शिकायला होत्या. पंडित भीमसेन जोशी हे किराणा घराण्याचे गायक. पण ते कधीच त्या परंपरेत अडकून राहिले नाहीत. काही राग एकत्र करुन त्यांनी त्यातून नव्या रागाला जन्माला घातलं. ते म्हणजे राग कलाश्री आणि ललितभटियार.

वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांचा पहिला लाईव्ह परफॉर्मन्स झाला. तर वयाच्या 22 व्या वर्षी एचएमव्ही कंपनीनं त्यांचा पहिला अल्बम प्रकाशित केला. आपल्या गुरुच्या षठ्यब्दीपूर्ती निमित्त पुण्यात 1946 साली पंडित भीमसेन जोशींची पहिली जाहीर मैफिल झाली. शास्त्रीय संगीताबरोबरच पंडितजींनी नाट्यसंगीत, ठुमरी, भजन यातही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. जो भजे हरि को सदा हे त्यांचं भजन विशेष करुन गाजलं. माझे माहेर पंढरी, इंद्रायणी काठी, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या अभंगांबरोबरच त्यांचे इतर अनेक अभंग आजही अजरामर आहेत. एकादशी म्हटलं कुठल्याही गावातल्या विठ्ठल मंदिरात पंडितजींचा बहारदार आवाज ऐकायला येतोच. पंडितजींच्या संतवाणीनं खर्‍या अर्थानं सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेतला.आपल्या पहाडी आवाजातून विठ्ठलाचं नामस्मरण करणारा पंडितजींच्या व्यक्तिरेखेतला सूर हीच एक आठवण आता आपल्यासाठी उरली आहे. पंडितजींनी कन्नड, मराठी, हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्येही पार्श्वगायन केलं. 1985 साली त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट पार्श्वगायनाचा पुरस्कारही मिळाला. मैफलीच्या पहिल्या षड्जापासून भैरवीपर्यंत रसिकांना मन:पूर्वक गाणं ऐकवायचं, हा भीमसेनजींचा गानधर्म. आपले गुरु सवाई गंधर्व यांच्या स्मृती जागवण्यासाठी त्यांनी 1952 साली पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवाचं रोपटं लावलं. गेली 58 वर्ष अविरतपणे सुरु असलेल्या महोत्सवाचं आज कल्पवृक्षात रुपांतर झालं. एवढंच नाही तर पुण्याच्या विद्यापीठ रोडवर सवाई गंधर्वांच्या नावाचं स्मारकही त्यांनी उभारलं. भीमसेनजींच्या सन्मानार्थ पुणे विद्यापीठानं त्यांच्या नावानं एक अध्यासनही सुरु केलं. पद्मश्रीपासून ते भारतरत्नपर्यंत असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.

ख्यालगायकीचे सम्राट असलेले पंडितजी उत्तम ड्रायव्हिंगही करायचे. त्यांच्याकडे असलेल्या मर्सिडिज गाडीवर त्यांचं विशेष प्रेम होतं.अत्यंत नेमक्या मोजक्या शब्दात आपल्या भावना व्यक्त करणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. भारतरत्न स्वीकारताना देखील पंडितजी म्हणाले होते भारतीय ख्याल गायन परंपरेत आजवर अनेक कलावंतांनी दिलेल्या योगदानाबद्दल मी हा पुरस्कार स्वीकारतोय ही त्यांची प्रतिक्रिया त्यांच्यातल्या विनम्रतेचं दर्शन घडवून गेली. माझ्या अंतिम स्वरामध्ये जीवनाच्या सर्व विभूती एकत्र याव्यात, गाणं हेच माझं जीवन सर्वस्व त्या ईश्वराच्या चरणी लीन व्हावं असं म्हणतच पंडितजी आज आपल्यातून निघून गेलेत. स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशींना आयबीएन लोकमतची भावपूर्ण श्रद्धांजली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2011 07:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close