S M L

डॉ. सेन यांची पत्नी एलिनावर नागपूरमध्ये गुन्हा दाखल

25 जानेवारीछत्तीसगडच्या बिलासपूर हायकोर्टात आज बिनायक सेन यांच्या जामिन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली सध्या ते जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. या दरम्यान त्यांच्या पत्नी एलिना सेन यांच्यावर वर्धा इथल्या सेवाग्राम पोलीस स्टेशनमध्ये काल गुन्हा दाखल करण्यात आला. वर्ध्यात एलिना सेन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशविदेशातले पाहुणे आले होते. यामध्ये सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांची माहिती पोलिसांना न दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. नागपूर एटीएसनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. महिलांच्या राष्ट्रीय परिषदेत देशविदेशातले अनेक अभ्यासक सहभागी झाले होते. यामध्ये परदेशी अभ्यासकही सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2011 03:53 PM IST

डॉ. सेन यांची पत्नी एलिनावर नागपूरमध्ये गुन्हा दाखल

25 जानेवारी

छत्तीसगडच्या बिलासपूर हायकोर्टात आज बिनायक सेन यांच्या जामिन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली सध्या ते जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. या दरम्यान त्यांच्या पत्नी एलिना सेन यांच्यावर वर्धा इथल्या सेवाग्राम पोलीस स्टेशनमध्ये काल गुन्हा दाखल करण्यात आला. वर्ध्यात एलिना सेन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशविदेशातले पाहुणे आले होते. यामध्ये सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांची माहिती पोलिसांना न दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. नागपूर एटीएसनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. महिलांच्या राष्ट्रीय परिषदेत देशविदेशातले अनेक अभ्यासक सहभागी झाले होते. यामध्ये परदेशी अभ्यासकही सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2011 03:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close