S M L

राहुल गांधींना भेटायला गेलेल्या 8 शेतकर्‍यांना अटक

27 जानेवारीबुलढाण्यात राहुल गांधी पोहोचले असता त्यांना भेटायला गेलेल्या सावकार पिडित आठ शेतकर्‍यांना पोलिसांनी अटक केली. शेतकर्‍यांचे प्रश्न मांडण्यासाठी हे सावकार पिडित शेतकरी गेले होते. तर दुसरीकडे स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार म्हणून संघटनेच्या 6 जणांना अटक केली. केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांची हकालपट्टी करा आणि काँग्रेस आमदार सानंदा यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करणार होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.दरम्यान काँग्रेसचे महासचिव राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौर्‍याला गडचिरोलीपासून सुरूवात झालीे. आजपासून 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यावर ते आहेत. राहुल गांधी आता मराठवाड्याच्या दौर्‍यासाठी रवाना झाले आहे. ते परभणी इथं जाणार आहेत. सकाळच्या सत्रात त्यांनी गडचिरोलीमध्ये आदिवासी तरूणांशी संवाद साधला. गडचिरोलीप्रमाणेच बुलढाणा आणि परभणी या जिल्ह्यांचा ते धावता आढावा घेत आहेत. या दौर्‍यात राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा कार्यक्रम अगोदरपासूनच नियोजित केला गेला. राहुल गांधी आणि प्रदेश काँग्रेसचे महासचिव गणेश पाटील काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. गेल्या 6 महिन्यांतला राहुल गांधींचा हा दुसरा दौरा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2011 10:00 AM IST

राहुल गांधींना भेटायला गेलेल्या 8 शेतकर्‍यांना अटक

27 जानेवारी

बुलढाण्यात राहुल गांधी पोहोचले असता त्यांना भेटायला गेलेल्या सावकार पिडित आठ शेतकर्‍यांना पोलिसांनी अटक केली. शेतकर्‍यांचे प्रश्न मांडण्यासाठी हे सावकार पिडित शेतकरी गेले होते. तर दुसरीकडे स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार म्हणून संघटनेच्या 6 जणांना अटक केली. केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांची हकालपट्टी करा आणि काँग्रेस आमदार सानंदा यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करणार होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

दरम्यान काँग्रेसचे महासचिव राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौर्‍याला गडचिरोलीपासून सुरूवात झालीे. आजपासून 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यावर ते आहेत. राहुल गांधी आता मराठवाड्याच्या दौर्‍यासाठी रवाना झाले आहे. ते परभणी इथं जाणार आहेत. सकाळच्या सत्रात त्यांनी गडचिरोलीमध्ये आदिवासी तरूणांशी संवाद साधला. गडचिरोलीप्रमाणेच बुलढाणा आणि परभणी या जिल्ह्यांचा ते धावता आढावा घेत आहेत. या दौर्‍यात राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा कार्यक्रम अगोदरपासूनच नियोजित केला गेला. राहुल गांधी आणि प्रदेश काँग्रेसचे महासचिव गणेश पाटील काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. गेल्या 6 महिन्यांतला राहुल गांधींचा हा दुसरा दौरा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2011 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close