S M L

दलित आणि अल्पसंख्याक समाजात मोठा नेता नाही - राहुल गांधी

28 जानेवारीमहाराष्ट्राच्या दौर्‍यावर असलेले काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज उस्मानाबादमध्ये अल्पसंख्याक आणि दलित युवकांशी संवाद साधला. समाजातल्या सर्वच थरातल्या युवकांनी राजकारणात आलं पाहिजे असं ते म्हणाले. आज दलित आणि अल्पसंख्याक समाजात मोठा नेता नाही. आता युवकांनी युथ काँग्रेसच्या माध्यमातून ही पोकळी भरून काढली पाहिजे असं आवाहन त्यांनी युवकांना केलं. तर काँग्रेसमध्ये यापुढे घराणेशाहीला थारा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान राहुल गांधी आज अहमदनगरच्या दौर्‍यावर आहेत. साई संस्थानच्या हेलिपॅडवर तीन वाजता त्यांचं चॉपर उतरणार आहे. साईबाबांचं दर्शन घेतल्यावर ते राहता गावातील सेंट जॉर्ज स्कूल इथल्या युवकांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम युवक काँग्रेसनं आयोजित केला. राहुल गांधीच्या दौर्‍यामुळे शिर्डीत सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2011 09:46 AM IST

दलित आणि अल्पसंख्याक समाजात मोठा नेता नाही - राहुल गांधी

28 जानेवारी

महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असलेले काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज उस्मानाबादमध्ये अल्पसंख्याक आणि दलित युवकांशी संवाद साधला. समाजातल्या सर्वच थरातल्या युवकांनी राजकारणात आलं पाहिजे असं ते म्हणाले. आज दलित आणि अल्पसंख्याक समाजात मोठा नेता नाही. आता युवकांनी युथ काँग्रेसच्या माध्यमातून ही पोकळी भरून काढली पाहिजे असं आवाहन त्यांनी युवकांना केलं. तर काँग्रेसमध्ये यापुढे घराणेशाहीला थारा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान राहुल गांधी आज अहमदनगरच्या दौर्‍यावर आहेत. साई संस्थानच्या हेलिपॅडवर तीन वाजता त्यांचं चॉपर उतरणार आहे. साईबाबांचं दर्शन घेतल्यावर ते राहता गावातील सेंट जॉर्ज स्कूल इथल्या युवकांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम युवक काँग्रेसनं आयोजित केला. राहुल गांधीच्या दौर्‍यामुळे शिर्डीत सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2011 09:46 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close