S M L

मराठा बटालियनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिम्मित कार्यक्रमाचं आयोजन

28 जानेवारीभारतीय सैन्य दलातील सहा मराठा बटालियन यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहेत. 1 फेब्रुवारी 1962 रोजी या बटालीयनची स्थापना करण्यात आली. या बटालीयननं अनेक युध्दात उत्तम कामगिरी केली. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करण्यासाठी या बटालयीनच्या जवानांनी 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात अनेक रंगारंग कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. याच कार्यक्रमाची काल गुरूवारी रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी लेझीम, झांज पथकासह मल्लखांबावरील चित्तथरारक कसरती जवानांनी सादर केल्या. तर रोशनाई बॅन्ड पथकाच्या संचलन लक्षवेधी ठरलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2011 01:29 PM IST

मराठा बटालियनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिम्मित कार्यक्रमाचं आयोजन

28 जानेवारी

भारतीय सैन्य दलातील सहा मराठा बटालियन यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहेत. 1 फेब्रुवारी 1962 रोजी या बटालीयनची स्थापना करण्यात आली. या बटालीयननं अनेक युध्दात उत्तम कामगिरी केली. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करण्यासाठी या बटालयीनच्या जवानांनी 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात अनेक रंगारंग कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. याच कार्यक्रमाची काल गुरूवारी रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी लेझीम, झांज पथकासह मल्लखांबावरील चित्तथरारक कसरती जवानांनी सादर केल्या. तर रोशनाई बॅन्ड पथकाच्या संचलन लक्षवेधी ठरलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2011 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close