S M L

औरंगाबादमध्ये राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक

28 जानेवारीकाँग्रसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक सध्या औरंगाबादेत सुरु झाली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री विलासराव देशमुख तसेच पक्षाचे राज्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. या आधी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आज अहमदनगरच्या दौर्‍यावर गेले होते. साई संस्थानच्या हेलिपॅडवर तीन वाजता त्यांचं चॉपर उतरलं. साई बाबांचं दर्शन घेतल्यावर त्यांनी राहता गावातील सेंट जॉर्ज स्कूल इथल्या युवकांशी संवाद साधला. यात पंधरा वर्षाच्या युवकांपासून ते पस्तीस वर्षाच्या महिलंाचाही समावेश आहे. हा कार्यक्रम युवक काँग्रेसनं आयोजित केला होता. राहुल गांधीच्या दौर्‍यामुळे शिर्डीत सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली. शिर्डीत येणार्‍या साईभक्तांची कसून चौकशी करण्यात आली होती. 6 डिव्हायएसपी, 17 पीआय आणि 29 पीएसआयसह 500 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2011 02:23 PM IST

औरंगाबादमध्ये राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक

28 जानेवारी

काँग्रसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक सध्या औरंगाबादेत सुरु झाली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री विलासराव देशमुख तसेच पक्षाचे राज्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.

या आधी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आज अहमदनगरच्या दौर्‍यावर गेले होते. साई संस्थानच्या हेलिपॅडवर तीन वाजता त्यांचं चॉपर उतरलं. साई बाबांचं दर्शन घेतल्यावर त्यांनी राहता गावातील सेंट जॉर्ज स्कूल इथल्या युवकांशी संवाद साधला. यात पंधरा वर्षाच्या युवकांपासून ते पस्तीस वर्षाच्या महिलंाचाही समावेश आहे. हा कार्यक्रम युवक काँग्रेसनं आयोजित केला होता. राहुल गांधीच्या दौर्‍यामुळे शिर्डीत सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली. शिर्डीत येणार्‍या साईभक्तांची कसून चौकशी करण्यात आली होती. 6 डिव्हायएसपी, 17 पीआय आणि 29 पीएसआयसह 500 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2011 02:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close