S M L

रमेश तेंडुलकर यांच्या 'भाव मुके' या सीडीचं सचिनच्या हस्ते प्रकाशन

29 जानेवारीमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर यांच्या निवडक कवितांच्या सीडीचं आज प्रकाशन झालं.मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या सीडीचं प्रकाशन करण्यात आलं. रमेश तेंडुलकर यांच्या निवडक 9 कविता या सीडीत आहेत. या कार्यक्रमाला लिटिल मास्टर सुनिल गावस्कर तसेच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी उपस्थिती लावली. अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सुमित राघवन यांनी या कार्यक्रमाचं सुत्र संचालन केलं. 'भाव मुके' असं सीडीचं नाव आहे. या सीडीची कल्पना क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांची असून अशोक पत्की यांनी संगीत दिलं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 51 सेंच्युरी केल्याबद्दल सचिन तेंडुलकरचा खास सत्कार यावेळी करण्यात आला. 51 ग्रॅम सोन्याचं मानचिन्ह त्याला भेट देण्यात आलं. तसेच कॅलीग्राफर अच्युत पालव यांनी सचिनच्या प्रत्येक सेंच्युरीची माहिती असलेली पोथी त्याला भेट दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2011 04:40 PM IST

रमेश तेंडुलकर यांच्या 'भाव मुके' या सीडीचं सचिनच्या हस्ते प्रकाशन

29 जानेवारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर यांच्या निवडक कवितांच्या सीडीचं आज प्रकाशन झालं.मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या सीडीचं प्रकाशन करण्यात आलं. रमेश तेंडुलकर यांच्या निवडक 9 कविता या सीडीत आहेत. या कार्यक्रमाला लिटिल मास्टर सुनिल गावस्कर तसेच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी उपस्थिती लावली. अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सुमित राघवन यांनी या कार्यक्रमाचं सुत्र संचालन केलं. 'भाव मुके' असं सीडीचं नाव आहे. या सीडीची कल्पना क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांची असून अशोक पत्की यांनी संगीत दिलं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 51 सेंच्युरी केल्याबद्दल सचिन तेंडुलकरचा खास सत्कार यावेळी करण्यात आला. 51 ग्रॅम सोन्याचं मानचिन्ह त्याला भेट देण्यात आलं. तसेच कॅलीग्राफर अच्युत पालव यांनी सचिनच्या प्रत्येक सेंच्युरीची माहिती असलेली पोथी त्याला भेट दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2011 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close