S M L

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा कोल्हापूरमध्ये सत्कार आयोजित

12 फेब्रुवारीपुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवल्याचा वाद अजूनही संपताना दिसत नाही. संभाजी ब्रिगेडनं पुतळा हटविण्यासाठी पुढाकार घेतलेल्या कार्यकर्त्यांचा कोल्हापुरात सत्कार ठेवला. तर दुसरीकडे शिवसेनेनं याला तीव्र विरोध करत हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. कोल्हापुरात रविवारी संभाजी ब्रिगेडच्यावतीने मराठा बहुजन जागृती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेनं जोरदार विरोध केला आहे. पण संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव हुजरे-पाटील यांनी या कार्यक्रमास कोणीही राजकीय रंग देऊ नये. कोणत्याही परिस्थितीत हा मेळावा होणारच असं जाहीर केलं आहे. त्यामुळे रविवारी काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2011 11:50 AM IST

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा कोल्हापूरमध्ये सत्कार आयोजित

12 फेब्रुवारी

पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवल्याचा वाद अजूनही संपताना दिसत नाही. संभाजी ब्रिगेडनं पुतळा हटविण्यासाठी पुढाकार घेतलेल्या कार्यकर्त्यांचा कोल्हापुरात सत्कार ठेवला. तर दुसरीकडे शिवसेनेनं याला तीव्र विरोध करत हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. कोल्हापुरात रविवारी संभाजी ब्रिगेडच्यावतीने मराठा बहुजन जागृती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेनं जोरदार विरोध केला आहे. पण संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव हुजरे-पाटील यांनी या कार्यक्रमास कोणीही राजकीय रंग देऊ नये. कोणत्याही परिस्थितीत हा मेळावा होणारच असं जाहीर केलं आहे. त्यामुळे रविवारी काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2011 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close