S M L

पुण्यात किशोरीताई आमोणकर यांचा सत्कार

12 फेब्रुवारीशास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचा पुण्यात खास सत्कार करण्यात येत आहे. 'सहेला रे' या कार्यक्रमाद्वारे किशोरीताईंना अनोखी मानवंदना दिली जात आहे. संगीतातील सर्व घराण्यांचे दिग्गज कलाकार यासाठी पुण्यात दाखल होत आहे. गणेश कलाक्रीडा मंच इथं आज आणि उद्या होत असलेला हा कार्यक्रम म्हणजे संगीत रसिकांकरता पर्वणीच ठरणार आहे. या कार्यक्रमाचे कौतुक करतानाच भारतीय अभिजात संगीत जपलं जावं अशी अपेक्षा किशोरीताईंनी व्यक्त केली. मात्र सध्याच्या संगीतातील भेसळीबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. सरकारने कलाकारांना केवळ पुरस्काराने गौरवण्याऐवजी संगीताच्या जपणूकीकरता, संवर्धनाकरता ठोस काम करावे असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. सहेला रे कार्यक्रमात सहभागी होणार्‍या कलाकारांनीही किशोरी ताईंच्या सत्कारानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करतानाच हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांचं अभिनंदन केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2011 03:37 PM IST

पुण्यात किशोरीताई आमोणकर यांचा सत्कार

12 फेब्रुवारी

शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचा पुण्यात खास सत्कार करण्यात येत आहे. 'सहेला रे' या कार्यक्रमाद्वारे किशोरीताईंना अनोखी मानवंदना दिली जात आहे. संगीतातील सर्व घराण्यांचे दिग्गज कलाकार यासाठी पुण्यात दाखल होत आहे. गणेश कलाक्रीडा मंच इथं आज आणि उद्या होत असलेला हा कार्यक्रम म्हणजे संगीत रसिकांकरता पर्वणीच ठरणार आहे. या कार्यक्रमाचे कौतुक करतानाच भारतीय अभिजात संगीत जपलं जावं अशी अपेक्षा किशोरीताईंनी व्यक्त केली. मात्र सध्याच्या संगीतातील भेसळीबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. सरकारने कलाकारांना केवळ पुरस्काराने गौरवण्याऐवजी संगीताच्या जपणूकीकरता, संवर्धनाकरता ठोस काम करावे असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. सहेला रे कार्यक्रमात सहभागी होणार्‍या कलाकारांनीही किशोरी ताईंच्या सत्कारानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करतानाच हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांचं अभिनंदन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2011 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close