S M L

ठाण्यात शिवसेनेने सामाजिक उपक्रम राबवत केला व्हॅलेंटाईन डे साजरा

14 फेब्रुवारीआज व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा होत आहे. यावेळच्या व्हॅलेंटाईन डेचं वैशिष्ट्य म्हणजे हा व्हॅलेंटाईन डे भयमुक्त वातावरणात साजरा होत आहे. एरवी शिवसेनेच्या विरोधाची दहशत व्हॅलेंटाईन डेवर असायची पण यावेळी शिवसेनेनं व्हॅलेंटाईन डेला इतरांना त्रास न देता काही सामाजिक उपक्रम आयोजित करुन व्हॅलेंटाईन डे साजरा केला. ठाण्यात आज शिवसेनेतर्फे मरणोत्तर अवयव दानासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र उभारुन तरुण तरुणींकडून अर्ज भरुन घेण्यात आले. तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठाननं ज्येष्ठ नागरिकांची एक रॅली काढली होती. तसेच गतीमंद मुलांसह गाणी आणि गप्पांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचा व्हॅलेंटाईन डेला विरोध नसून पाश्चिमात्य संस्कृतीला विरोध असल्याचं शिवसैनिकांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 14, 2011 01:49 PM IST

ठाण्यात शिवसेनेने सामाजिक उपक्रम राबवत केला व्हॅलेंटाईन डे साजरा

14 फेब्रुवारी

आज व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा होत आहे. यावेळच्या व्हॅलेंटाईन डेचं वैशिष्ट्य म्हणजे हा व्हॅलेंटाईन डे भयमुक्त वातावरणात साजरा होत आहे. एरवी शिवसेनेच्या विरोधाची दहशत व्हॅलेंटाईन डेवर असायची पण यावेळी शिवसेनेनं व्हॅलेंटाईन डेला इतरांना त्रास न देता काही सामाजिक उपक्रम आयोजित करुन व्हॅलेंटाईन डे साजरा केला. ठाण्यात आज शिवसेनेतर्फे मरणोत्तर अवयव दानासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र उभारुन तरुण तरुणींकडून अर्ज भरुन घेण्यात आले. तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठाननं ज्येष्ठ नागरिकांची एक रॅली काढली होती. तसेच गतीमंद मुलांसह गाणी आणि गप्पांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेचा व्हॅलेंटाईन डेला विरोध नसून पाश्चिमात्य संस्कृतीला विरोध असल्याचं शिवसैनिकांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 14, 2011 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close