S M L

राज ठाकरे यांच्या हस्ते 'कुसुमांजली' कार्यक्रमाचं उद्घाटन

26 फेब्रुवारीकुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दी आणि मराठी भाषा दिनानिमित्त पुण्यात शनिवार आणि रविवारी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते 'कुसुमांजली ' या कार्यक्रमाचं उद्घाटन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आलं. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आपण मराठी भाषेसाठी आंदोलन करतो. त्याला कोणी आंदोलन म्हणतं तर कोणी राडा म्हणतं. माझ्यासाठी या आंदोलनाचा मिळणारा रिझल्ट महत्त्वाचा आहे. असं म्हणतं कुसुमाग्रजाच्या भाषेत राज ठाकरे यांनी 'पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा' असं आव्हान मराठी माणसांना केलं. यावेळी जेष्ठ चित्रकार रवी परांजपे, जेष्ठ साहित्यिक ज.मा. मिरासदार, अभिनेते रविंद्र मंकणी हे मान्यवर उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2011 11:08 AM IST

राज ठाकरे यांच्या हस्ते 'कुसुमांजली' कार्यक्रमाचं उद्घाटन

26 फेब्रुवारी

कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दी आणि मराठी भाषा दिनानिमित्त पुण्यात शनिवार आणि रविवारी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते 'कुसुमांजली ' या कार्यक्रमाचं उद्घाटन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आलं. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी आपण मराठी भाषेसाठी आंदोलन करतो. त्याला कोणी आंदोलन म्हणतं तर कोणी राडा म्हणतं. माझ्यासाठी या आंदोलनाचा मिळणारा रिझल्ट महत्त्वाचा आहे. असं म्हणतं कुसुमाग्रजाच्या भाषेत राज ठाकरे यांनी 'पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा' असं आव्हान मराठी माणसांना केलं. यावेळी जेष्ठ चित्रकार रवी परांजपे, जेष्ठ साहित्यिक ज.मा. मिरासदार, अभिनेते रविंद्र मंकणी हे मान्यवर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2011 11:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close