S M L

डॉ.आशा भोसले !

01 मार्चज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलु आपल्याला माहिती आहेत. पण आता त्या डॉक्टर आशा भोसले झाल्या आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे त्यांना डी.लिट या पदवीनं सन्मानित करण्यात आले आहे. मुक्त विद्यापीठाच्या 17 व्या दीक्षांत समारंभात नाशिकमधल्या कार्यक्रमात त्यांना ही पदवी देण्यात आली. हा सन्मान म्हणजे म्हणजे पद्मभूषण पेक्षा मोठा वाटत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. राज्यपाल के. शंकरनारायण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू राजशेखरन पिल्लई या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. राज्याचे सार्वजनिक मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे हे ही कार्यक्रमाला उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2011 10:58 AM IST

डॉ.आशा भोसले !

01 मार्च

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलु आपल्याला माहिती आहेत. पण आता त्या डॉक्टर आशा भोसले झाल्या आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे त्यांना डी.लिट या पदवीनं सन्मानित करण्यात आले आहे. मुक्त विद्यापीठाच्या 17 व्या दीक्षांत समारंभात नाशिकमधल्या कार्यक्रमात त्यांना ही पदवी देण्यात आली. हा सन्मान म्हणजे म्हणजे पद्मभूषण पेक्षा मोठा वाटत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. राज्यपाल के. शंकरनारायण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू राजशेखरन पिल्लई या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. राज्याचे सार्वजनिक मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे हे ही कार्यक्रमाला उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2011 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close