S M L

अमिताभ बच्चनचं ही पुण्यात घर !

07 मार्चमुंबईतील कलाकार आणि क्रिकेटर्सकरता पुणे हे सेकंड होम डेस्टीनेशन होऊ लागले आहे. सचिन तेंडुलकर पाठोपाठ आता अमिताभ बच्चन याचं ही पुण्यात बंगला बांधून तयार होतोय. पुण्यातील हडपसर भागात साकारत असलेल्या ऍमेनोरा टाऊनशीपमधल्या 75 आलिशान बंगल्यांपैकी एक बंगला अमिताभ बच्चन खरेदी करत आहे. सुमारे 12,500 स्क्वेअर फीट एरीयाच्या प्लॉटवर 5000 स्क्वेअर फूट जागेत हा बंगला उभा राहणार आहे. ऍमनोराचे संचालक अनिरूध्द देशपांडे यांनी ही माहिती दिली.गेल्यावर्षी मराठी साहित्य संमेलनाकरता पुण्यात हजेरी लावलेल्या अमिताभनं पुणे दौर्‍यात ऍमनोरा टाऊनशीपमधे मधुशाला हा कविता वाचनाचा कार्यक्रम सादर केला होता. ऍमनोराचा परिसर अमिताभला आवडला. इथं साकारत असलेल्या 75 बंगल्याच्या प्रकल्पाची माहिती अमिताभनं घेतली आणि 2 महिन्यात या प्रकल्पात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सुमारे 12,500 स्क्वेअर फीट एरीयाच्या प्लॉटवर 5000 स्क्वेअर फूट जागेत हा बंगला उभा राहणार आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात सचिन तेंडुलकरनं बंगला घेतला पण सचिनला हा बंगला भेट मिळाला आणि तो या प्रकल्पाचा ब्रँड ऍंबॅसीडरही बनला. अमिताभनं मात्र ग्राहक या नात्यानं हा बंगला खरेदी करतोय. नाना पाटेकर,अमोल पालेकर यासारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी पुण्यात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पुणेकरांच्या यादीत आणखी एका मोठ्या नावाची भर पडली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 7, 2011 05:24 PM IST

अमिताभ बच्चनचं ही पुण्यात घर !

07 मार्च

मुंबईतील कलाकार आणि क्रिकेटर्सकरता पुणे हे सेकंड होम डेस्टीनेशन होऊ लागले आहे. सचिन तेंडुलकर पाठोपाठ आता अमिताभ बच्चन याचं ही पुण्यात बंगला बांधून तयार होतोय. पुण्यातील हडपसर भागात साकारत असलेल्या ऍमेनोरा टाऊनशीपमधल्या 75 आलिशान बंगल्यांपैकी एक बंगला अमिताभ बच्चन खरेदी करत आहे. सुमारे 12,500 स्क्वेअर फीट एरीयाच्या प्लॉटवर 5000 स्क्वेअर फूट जागेत हा बंगला उभा राहणार आहे. ऍमनोराचे संचालक अनिरूध्द देशपांडे यांनी ही माहिती दिली.

गेल्यावर्षी मराठी साहित्य संमेलनाकरता पुण्यात हजेरी लावलेल्या अमिताभनं पुणे दौर्‍यात ऍमनोरा टाऊनशीपमधे मधुशाला हा कविता वाचनाचा कार्यक्रम सादर केला होता. ऍमनोराचा परिसर अमिताभला आवडला. इथं साकारत असलेल्या 75 बंगल्याच्या प्रकल्पाची माहिती अमिताभनं घेतली आणि 2 महिन्यात या प्रकल्पात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सुमारे 12,500 स्क्वेअर फीट एरीयाच्या प्लॉटवर 5000 स्क्वेअर फूट जागेत हा बंगला उभा राहणार आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात सचिन तेंडुलकरनं बंगला घेतला पण सचिनला हा बंगला भेट मिळाला आणि तो या प्रकल्पाचा ब्रँड ऍंबॅसीडरही बनला. अमिताभनं मात्र ग्राहक या नात्यानं हा बंगला खरेदी करतोय.

नाना पाटेकर,अमोल पालेकर यासारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी पुण्यात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पुणेकरांच्या यादीत आणखी एका मोठ्या नावाची भर पडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 7, 2011 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close