S M L

चाहत्यांच्या गोंधळामुळे माधुरीचा कार्यक्रम काढता पाय !

09 मार्चजागतिक महिला दिनाचं औचित्यसाधत श्रीरामपूरमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षितचा खास सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण चाहत्यांच्या गोंधळामुळे तिला त्या कार्यक्रमातून काढता पाय घ्यावा लागला. यावेळी क्रिकेटर जहीर खानच्या आईला सन्मानित करण्यात आलं पण तेही गडबड गोंधळातच माधुरी दीक्षित या सोहळ्याला येणार म्हणून तिच्या हजारो चाहत्यांनी तीला पाहाण्यासाठी थत्ते मैदानावर गर्दी केली होती. या गराड्यात हरवलेल्या माधुरीला बघण्यासाठी या चाहत्यांनी स्टेजकडे धाव घेतली आणि गोंधळाला सुरूवात झाली. स्वत: माधुरी सगळ्यांना शांत राहण्याचे आणि आपल्या जागांवर बसण्याचे आवाहन करत होती मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. स्टेजवर मान्यवरांच्या गर्दीत माधुरी दिसत नसल्याने अनेकांनी थेट स्टेजवर येण्याचा प्रयत्नही केला. तर त्याना रोखण्यासाठी काही लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यातले काही दगड थेट माधुरी पर्यंत जाऊन पोहचले. आणि ही परिस्थिती पाहुन माधुरीनं तिथून निघण्याचा निर्णय घेतला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2011 02:32 PM IST

चाहत्यांच्या गोंधळामुळे माधुरीचा कार्यक्रम काढता पाय !

09 मार्च

जागतिक महिला दिनाचं औचित्यसाधत श्रीरामपूरमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षितचा खास सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण चाहत्यांच्या गोंधळामुळे तिला त्या कार्यक्रमातून काढता पाय घ्यावा लागला. यावेळी क्रिकेटर जहीर खानच्या आईला सन्मानित करण्यात आलं पण तेही गडबड गोंधळातच माधुरी दीक्षित या सोहळ्याला येणार म्हणून तिच्या हजारो चाहत्यांनी तीला पाहाण्यासाठी थत्ते मैदानावर गर्दी केली होती. या गराड्यात हरवलेल्या माधुरीला बघण्यासाठी या चाहत्यांनी स्टेजकडे धाव घेतली आणि गोंधळाला सुरूवात झाली. स्वत: माधुरी सगळ्यांना शांत राहण्याचे आणि आपल्या जागांवर बसण्याचे आवाहन करत होती मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. स्टेजवर मान्यवरांच्या गर्दीत माधुरी दिसत नसल्याने अनेकांनी थेट स्टेजवर येण्याचा प्रयत्नही केला. तर त्याना रोखण्यासाठी काही लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यातले काही दगड थेट माधुरी पर्यंत जाऊन पोहचले. आणि ही परिस्थिती पाहुन माधुरीनं तिथून निघण्याचा निर्णय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2011 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close