S M L

विकिलिक्सवरून पंतप्रधान निवेदन देण्याची शक्यता

18 मार्चविकिलिक्स प्रकरणी पंतप्रधान थोड्याच वेळात लोकसभेत निवेदन करणार आहे. अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल यांनी दिली. विकिलिक्सच्या मुद्दयावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गोंधळ झाला. त्यामुळे अध्यक्षांना कामकाज तहकूब करावं लागलं. कार्यक्रम पत्रिकेवरच्या विषयानुसारच बोला असं सांगत, लोकसभाध्यक्षांनी विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांना विकिलिक्स प्रकरणी बोलायला परवानगी नाकारली. लोकसभेच कामकाज याचं घडामोडीने सुरू झाले. आणि त्यामुळेच लालकृष्ण अडवाणींसह सगळेच नेते या मुद्द्यावर आक्रमकपणे निषेध करताना दिसले. याचवेळी विरोधकांनी गोंधळ घातला आणि स्वराज यांना बोलू देण्याची मागणी केली.अखेर मीराकुमार यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केली. दुपारी कामकाज सुरू झाल्यानंतरही गोंधळाचीच शक्यता आहे. त्याचवेळी राज्यसभेतही याच मुद्द्यावरून सदस्यांनी गोंधळ घातला. विकिलिक्सवरून गुरूवारी गदारोळ झाल्यानंतर हिंदू वृत्तपत्रात विकिलिक्सच्या अजून एका केबलचा बॉम्बगोळा टाकण्यात आला. भारतासोबतच्या अणूकरारासाठी अमेरिका इतका उतावीळ झाला होता. हा करार महत्वाच्या नेत्यांच्या गळी उतरवण्यासाठी अमेरिकेनं आपल्या भारतातील राजदूत डेविड मलफोर्ड यांनाही यामध्ये सहभागी करुन घेतले. सोनिया गांधी आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांचा पाठिंबा मिळवणे, डाव्या आघाडीला युपीए सरकारपासून दूर करणं अशी कामं मलफोर्ड यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र अडवाणी यांनी अमेरिकेचा सल्ला धूडकावून लावल्याचंही या केबलमध्ये म्हटलं आहे. अर्थमंत्रालयाचा कारभार माँटेक सिंह किंवा चिदंबरम यांना न देता प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवण्यात आल्याने अमेरिका नाराज झाल्याचे या केबलमध्ये म्हटलं आहे. मुरली देवरा यांना पेट्रोलियम मंत्रीपद दिल्याने अमेरिकेने समाधान व्यक्त केल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला. अमेरिकेच्या स्टेट सेक्रेटरी हिलरी क्लिटंन यांनी 2009 मध्ये प्रणव मुखर्जी यांची आर्थिक ध्येयधोरणे काय त्यांचे कोणत्या उद्योगसमूहाशी चांगले संबंध आहे हे तपासायला सांगीतले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 18, 2011 09:23 AM IST

विकिलिक्सवरून पंतप्रधान निवेदन देण्याची शक्यता

18 मार्च

विकिलिक्स प्रकरणी पंतप्रधान थोड्याच वेळात लोकसभेत निवेदन करणार आहे. अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल यांनी दिली. विकिलिक्सच्या मुद्दयावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गोंधळ झाला. त्यामुळे अध्यक्षांना कामकाज तहकूब करावं लागलं. कार्यक्रम पत्रिकेवरच्या विषयानुसारच बोला असं सांगत, लोकसभाध्यक्षांनी विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांना विकिलिक्स प्रकरणी बोलायला परवानगी नाकारली.

लोकसभेच कामकाज याचं घडामोडीने सुरू झाले. आणि त्यामुळेच लालकृष्ण अडवाणींसह सगळेच नेते या मुद्द्यावर आक्रमकपणे निषेध करताना दिसले. याचवेळी विरोधकांनी गोंधळ घातला आणि स्वराज यांना बोलू देण्याची मागणी केली.अखेर मीराकुमार यांनी दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केली. दुपारी कामकाज सुरू झाल्यानंतरही गोंधळाचीच शक्यता आहे. त्याचवेळी राज्यसभेतही याच मुद्द्यावरून सदस्यांनी गोंधळ घातला.

विकिलिक्सवरून गुरूवारी गदारोळ झाल्यानंतर हिंदू वृत्तपत्रात विकिलिक्सच्या अजून एका केबलचा बॉम्बगोळा टाकण्यात आला. भारतासोबतच्या अणूकरारासाठी अमेरिका इतका उतावीळ झाला होता. हा करार महत्वाच्या नेत्यांच्या गळी उतरवण्यासाठी अमेरिकेनं आपल्या भारतातील राजदूत डेविड मलफोर्ड यांनाही यामध्ये सहभागी करुन घेतले.

सोनिया गांधी आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांचा पाठिंबा मिळवणे, डाव्या आघाडीला युपीए सरकारपासून दूर करणं अशी कामं मलफोर्ड यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र अडवाणी यांनी अमेरिकेचा सल्ला धूडकावून लावल्याचंही या केबलमध्ये म्हटलं आहे.

अर्थमंत्रालयाचा कारभार माँटेक सिंह किंवा चिदंबरम यांना न देता प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवण्यात आल्याने अमेरिका नाराज झाल्याचे या केबलमध्ये म्हटलं आहे. मुरली देवरा यांना पेट्रोलियम मंत्रीपद दिल्याने अमेरिकेने समाधान व्यक्त केल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला. अमेरिकेच्या स्टेट सेक्रेटरी हिलरी क्लिटंन यांनी 2009 मध्ये प्रणव मुखर्जी यांची आर्थिक ध्येयधोरणे काय त्यांचे कोणत्या उद्योगसमूहाशी चांगले संबंध आहे हे तपासायला सांगीतले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 18, 2011 09:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close