S M L

''श्यामची आई'' पुस्तकाला 75 वर्ष पूर्ण

16 एप्रिलसानेगुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. गुरुजींनी ही पुस्तक लिहीलं ते नाशिकरोडच्या जेलमध्ये. त्यामुळे या पुस्तकाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं साने गुरुजी स्मारकाच्या वतीनं नाशिकमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. 2011 हे या पुस्तकाचं अमृतमहोत्सवी वर्ष. एका साध्या, बाळबोध, सुसंस्कृत घराण्यातल्या संस्कृतीचं आणि त्या वेळच्या समाजाचं चित्रण या पुस्तकात आलं आहे. श्यामची आई म्हणजे साने गुरुजींच्या बालपणीच्या आठवणी. तुमच्या आमच्या बालपणासारख्या त्या रम्य-सुंदर मात्र नाहीत. हे बालपण खडतर आहे, गरीबीचं आहे. पण या सगळ्याला पुरुन उरतो, तो आईनं कलेला प्रेमाचा वर्षाव, दिलेली मूल्य आणि कोणत्याही खडतर प्रसंगातून आपलं चारित्र्य अभंग राखून बाहेर कसं पडायचं याचं मिळालेलं शिक्षण. या कादंबरीच्या रचनेतही वेगळेप़ण आहे. श्याम आपल्या मित्रांना रोज रात्री एक याप्रमाणे ४२ रात्री आपल्या आईच्या आठवणी सांगतो. अतिशय साधी, सोपी आणि ह्रदयाला हात घालणारी भाषा हे याचं वैशिष्ट्यं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2011 09:33 AM IST

''श्यामची आई'' पुस्तकाला 75 वर्ष पूर्ण

16 एप्रिल

सानेगुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. गुरुजींनी ही पुस्तक लिहीलं ते नाशिकरोडच्या जेलमध्ये. त्यामुळे या पुस्तकाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं साने गुरुजी स्मारकाच्या वतीनं नाशिकमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

2011 हे या पुस्तकाचं अमृतमहोत्सवी वर्ष. एका साध्या, बाळबोध, सुसंस्कृत घराण्यातल्या संस्कृतीचं आणि त्या वेळच्या समाजाचं चित्रण या पुस्तकात आलं आहे. श्यामची आई म्हणजे साने गुरुजींच्या बालपणीच्या आठवणी. तुमच्या आमच्या बालपणासारख्या त्या रम्य-सुंदर मात्र नाहीत. हे बालपण खडतर आहे, गरीबीचं आहे. पण या सगळ्याला पुरुन उरतो, तो आईनं कलेला प्रेमाचा वर्षाव, दिलेली मूल्य आणि कोणत्याही खडतर प्रसंगातून आपलं चारित्र्य अभंग राखून बाहेर कसं पडायचं याचं मिळालेलं शिक्षण. या कादंबरीच्या रचनेतही वेगळेप़ण आहे. श्याम आपल्या मित्रांना रोज रात्री एक याप्रमाणे ४२ रात्री आपल्या आईच्या आठवणी सांगतो. अतिशय साधी, सोपी आणि ह्रदयाला हात घालणारी भाषा हे याचं वैशिष्ट्यं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2011 09:33 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close