S M L

शाही लग्नसोहळा काही वेळातच

29 एप्रिलब्रिटनच्या राजघराण्यातील एक ऐतिहासिक लग्नसोहळा काही वेळातच सुरू होणार आहे. विल्यम आणि केट यांचं लग्न म्हणजे या शतकातला ब्रिटनचा सर्वोत्तम सोहळा ठरणार आहे. लंडनच्या वेस्टमिन्स्टर ऍबेमध्ये प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडल्टन विवाहबद्ध होणार आहेत. दोन वाजल्यापासून या शाही विवाहसोहळ्याला सुरूवात होणार आहे. वेस्टमिनस्टर ऍबेमध्ये या सोहळ्यासाठी पाहुणे दाखल होत आहे. विवाह सोहळा पार पडल्यानंतर नवदाम्पत्य बकिंगहॅम पॅलेसमध्ये येणार आहे. इथूनच या नव्या जोडप्याला पाहण्याची संधी लाखो चाहत्यांना मिळणार आहे. त्यामुळे तिथं गेल्या काही दिवसांपासूनच चाहत्यांनी तळ ठोकला आहे. जवळपास10 लाख लोक या ठिकाणा आले आहेत. आणि या शाही सोहळ्यात भारतीयांचाही थोडा वाटा आहे हे तुम्हाला कदाचित माहित नसेल. भारतात जन्मलेले किशोर पटेल आणि त्यांची पत्नी फिओना केर्नस यांच्यावर या सोहळ्याला लागणार्‍या सगळ्या बेकिंगची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फिओना केर्नस ही ओळखली जाते ती तिच्या फ्रूट केकसाठी बोनो आणि पॉल मेकार्थी सारखे तिचे अनेक प्रसिद्ध् ग्राहकही आहेत. पण जेव्हा राजवाड्यातून तिला निमंत्रण आलं तेव्हा तर तिला प्रचंड आनंद झाला. शाही वधू केट मिडलटनची जेवणातली आवड-निवड फिओनालासुध्दा चांगलीच माहित आहे. केटला या लग्नात नक्की कशाप्रकारचा जेवण पाहिजे हे तिला व्यवस्थित ठाऊक आहे. या शाही सोहळ्यासाठी बनवण्यात येत असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये सर्वात महत्तवाचा पदार्थ म्हणजे वेडिंग केक. या केकची थीम फलोरल असणार आहे. क्रीम आणि पांढर्‍या आयसिंगने सजवलेला केकचा प्रत्येक थर वेगळ्या आणि हा केक असेल क्लासिक स्टाईल आणि टेस्टचा. त्यात कलर नसतील केवळ असेल क्रीम आणि त्यावर सुंदरशी फुलांची आरास. या शाही विवाहसोहळ्यासाठी सगळ्यांच्याच शुभेच्छा मिळाव्यात अशी ब्रिटनच्या राजघराण्याची इच्छा आहे. त्यामुळेच लंडनमधल्या हिंदू,शीख,जैन,बौध्द आणि मुस्लिम संघटना तसेच धर्मसंस्थांच्या नेत्यांना खास आमंत्रण देण्यात आलंय. यामध्ये हिंदू काऊन्सिल युके या संस्थेचे संस्थापक अनिल भानोत, जैन ऍकेडमीचे अध्यक्ष नथुभाई शहा यांचा समावेश आहे. तर शीख समाजाचे प्रतिनिधीत्व करतील शिखर संघटनेचे निमंत्रक इंद्रजीत सिंग तसेच इमाम मोहम्मद रझा, लंडनच्या बौद्ध विहाराचे प्रमुख भिख्खू बोगोडा सीलविमल, मोहम्मदी ट्रस्टचे मौलाना सईद रझा शब्बरम यांचाही समावेश आहे. मात्र ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि गॉर्डन ब्राऊन यांना या शाही सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं. असं लागणार लग्न- शाही मुहूर्त 29 एप्रिलचा - दुपारी 2 वा. इंग्लंडची राणी , वर आणि वधूला रॉयल टायटल्स बहाल करेल- दुपारी 3 वा.वेस्टमिन्स्टर ऍबेमध्ये पाहुण्यांचं आगमन- संध्याकाळी 4 वा. वधुची आई कॅरल मिडलटनचं आगमन- दुपारी 4.10 वा. राणी, प्रिन्स फिलीप आणि वर प्रिन्स विल्यम यांचं आगमन- दुपारी 4.20 वा. वधुच्या पाठराखीणीचं आगमन- दुपारी 4.30 वा.शाही वधू केट मिडलटनचं वडील मायकल मिडलटनसोबत रोल्स रॉईसमधून आगमन- दुपारी 5 वा - नवविवाहीत शाही दाम्पत्य निघणार बकिंगहॅम पॅलेसकडे - शहरभर घंटानाद-बकिंगहॅम पॅलेसमध्ये खासगी फोटोंचा कार्यक्रम-संध्याकाळी 6.25 वा. नवविवाहित शाही दाम्पत्य शाही कुटुंबासमवेत बकिंगहॅम पॅलेसच्या बाल्कनीत येतील.- रॉयल एअर फोर्सची शाही दाम्पत्याला मानवंदना-संध्याकाळनंतर प्रिन्स चार्ल्स यांनी दिलेल्या पार्टीला सुरूवात -रात्री उशीरापर्यंत चालणार पार्टी

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2011 09:20 AM IST

शाही लग्नसोहळा काही वेळातच

29 एप्रिल

ब्रिटनच्या राजघराण्यातील एक ऐतिहासिक लग्नसोहळा काही वेळातच सुरू होणार आहे. विल्यम आणि केट यांचं लग्न म्हणजे या शतकातला ब्रिटनचा सर्वोत्तम सोहळा ठरणार आहे. लंडनच्या वेस्टमिन्स्टर ऍबेमध्ये प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडल्टन विवाहबद्ध होणार आहेत. दोन वाजल्यापासून या शाही विवाहसोहळ्याला सुरूवात होणार आहे. वेस्टमिनस्टर ऍबेमध्ये या सोहळ्यासाठी पाहुणे दाखल होत आहे.

विवाह सोहळा पार पडल्यानंतर नवदाम्पत्य बकिंगहॅम पॅलेसमध्ये येणार आहे. इथूनच या नव्या जोडप्याला पाहण्याची संधी लाखो चाहत्यांना मिळणार आहे. त्यामुळे तिथं गेल्या काही दिवसांपासूनच चाहत्यांनी तळ ठोकला आहे. जवळपास10 लाख लोक या ठिकाणा आले आहेत.

आणि या शाही सोहळ्यात भारतीयांचाही थोडा वाटा आहे हे तुम्हाला कदाचित माहित नसेल. भारतात जन्मलेले किशोर पटेल आणि त्यांची पत्नी फिओना केर्नस यांच्यावर या सोहळ्याला लागणार्‍या सगळ्या बेकिंगची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

फिओना केर्नस ही ओळखली जाते ती तिच्या फ्रूट केकसाठी बोनो आणि पॉल मेकार्थी सारखे तिचे अनेक प्रसिद्ध् ग्राहकही आहेत. पण जेव्हा राजवाड्यातून तिला निमंत्रण आलं तेव्हा तर तिला प्रचंड आनंद झाला. शाही वधू केट मिडलटनची जेवणातली आवड-निवड फिओनालासुध्दा चांगलीच माहित आहे.

केटला या लग्नात नक्की कशाप्रकारचा जेवण पाहिजे हे तिला व्यवस्थित ठाऊक आहे. या शाही सोहळ्यासाठी बनवण्यात येत असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये सर्वात महत्तवाचा पदार्थ म्हणजे वेडिंग केक. या केकची थीम फलोरल असणार आहे. क्रीम आणि पांढर्‍या आयसिंगने सजवलेला केकचा प्रत्येक थर वेगळ्या आणि हा केक असेल क्लासिक स्टाईल आणि टेस्टचा. त्यात कलर नसतील केवळ असेल क्रीम आणि त्यावर सुंदरशी फुलांची आरास. या शाही विवाहसोहळ्यासाठी सगळ्यांच्याच शुभेच्छा मिळाव्यात अशी ब्रिटनच्या राजघराण्याची इच्छा आहे. त्यामुळेच लंडनमधल्या हिंदू,शीख,जैन,बौध्द आणि मुस्लिम संघटना तसेच धर्मसंस्थांच्या नेत्यांना खास आमंत्रण देण्यात आलंय. यामध्ये हिंदू काऊन्सिल युके या संस्थेचे संस्थापक अनिल भानोत, जैन ऍकेडमीचे अध्यक्ष नथुभाई शहा यांचा समावेश आहे. तर शीख समाजाचे प्रतिनिधीत्व करतील शिखर संघटनेचे निमंत्रक इंद्रजीत सिंग तसेच इमाम मोहम्मद रझा, लंडनच्या बौद्ध विहाराचे प्रमुख भिख्खू बोगोडा सीलविमल, मोहम्मदी ट्रस्टचे मौलाना सईद रझा शब्बरम यांचाही समावेश आहे. मात्र ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि गॉर्डन ब्राऊन यांना या शाही सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं.

असं लागणार लग्न

- शाही मुहूर्त 29 एप्रिलचा - दुपारी 2 वा. इंग्लंडची राणी , वर आणि वधूला रॉयल टायटल्स बहाल करेल- दुपारी 3 वा.वेस्टमिन्स्टर ऍबेमध्ये पाहुण्यांचं आगमन- संध्याकाळी 4 वा. वधुची आई कॅरल मिडलटनचं आगमन- दुपारी 4.10 वा. राणी, प्रिन्स फिलीप आणि वर प्रिन्स विल्यम यांचं आगमन- दुपारी 4.20 वा. वधुच्या पाठराखीणीचं आगमन- दुपारी 4.30 वा.शाही वधू केट मिडलटनचं वडील मायकल मिडलटनसोबत रोल्स रॉईसमधून आगमन- दुपारी 5 वा - नवविवाहीत शाही दाम्पत्य निघणार बकिंगहॅम पॅलेसकडे - शहरभर घंटानाद-बकिंगहॅम पॅलेसमध्ये खासगी फोटोंचा कार्यक्रम-संध्याकाळी 6.25 वा. नवविवाहित शाही दाम्पत्य शाही कुटुंबासमवेत बकिंगहॅम पॅलेसच्या बाल्कनीत येतील.- रॉयल एअर फोर्सची शाही दाम्पत्याला मानवंदना-संध्याकाळनंतर प्रिन्स चार्ल्स यांनी दिलेल्या पार्टीला सुरूवात -रात्री उशीरापर्यंत चालणार पार्टी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2011 09:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close