S M L

जनता अरे ला कारे करणार्‍यांची हुकूमशाही सहन करणार नाही - निखिल वागळे

30 एप्रिलज्या जनतेनं इंदिरा गांधींची आणीबाणीतली मनमानी सहन केली नाही, ती जनता अरे ला कारे करणार्‍या नेत्यांची हुकूमशाही मुळीच सहन करणार नाही अशी परखड टीका आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी केली. नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पक्षाच्या कार्यक्रमात अरे ला कारे करा असं वक्तव्य केलं होतं. पुण्यात वरूणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार वितरण कार्यक्रमात निखिल वागळे बोलत होते. त्याच कार्यक्रमात उपस्थित असलेले जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांनी यावेळी अजित पवारांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला. वरूणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार वितरण कार्यक्रमात संपादक निखिल वागळे यांनी पत्रकारिता आणि सद्यस्थिती या विषयावर रोखठोक शैलीत विचार मांडले. विश्वासार्हता असेल तरच पत्रकारिता टिकते असंही त्यांनी सांगितलं. यावेळी वरुणराज भिडे मित्रमंडळाच्या वतीने देण्यात येणारे पत्रकारिता पुरस्कार लोकमतचे ब्युरो चीफ अतुल कुलकर्णी, आश्वासक पत्रकारिता पुरस्कार देवेंद्र गावंडे आणि सतीश वैजापूरकर यांना देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे नेते उल्हास पवार आणि पुण्यातील अनेक मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2011 02:15 PM IST

जनता अरे ला कारे करणार्‍यांची हुकूमशाही सहन करणार नाही - निखिल वागळे

30 एप्रिल

ज्या जनतेनं इंदिरा गांधींची आणीबाणीतली मनमानी सहन केली नाही, ती जनता अरे ला कारे करणार्‍या नेत्यांची हुकूमशाही मुळीच सहन करणार नाही अशी परखड टीका आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी केली. नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पक्षाच्या कार्यक्रमात अरे ला कारे करा असं वक्तव्य केलं होतं. पुण्यात वरूणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार वितरण कार्यक्रमात निखिल वागळे बोलत होते. त्याच कार्यक्रमात उपस्थित असलेले जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांनी यावेळी अजित पवारांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला.

वरूणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार वितरण कार्यक्रमात संपादक निखिल वागळे यांनी पत्रकारिता आणि सद्यस्थिती या विषयावर रोखठोक शैलीत विचार मांडले. विश्वासार्हता असेल तरच पत्रकारिता टिकते असंही त्यांनी सांगितलं. यावेळी वरुणराज भिडे मित्रमंडळाच्या वतीने देण्यात येणारे पत्रकारिता पुरस्कार लोकमतचे ब्युरो चीफ अतुल कुलकर्णी, आश्वासक पत्रकारिता पुरस्कार देवेंद्र गावंडे आणि सतीश वैजापूरकर यांना देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे नेते उल्हास पवार आणि पुण्यातील अनेक मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2011 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close