S M L

महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन

01 मेआज एक मे अर्थात महाराष्ट्र दिन...राज्य भरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान करणार्‍या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा चौकात सकाळपासूनच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळी हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं. तर शिवाजी पार्कवर राज्यापालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गडचिरोलीमध्ये गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं.नक्षलवाद्यांना त्यांच्याच भाषेत चोख उत्तर देऊ, असा इशारा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिला. कुठलीही क्रांती बंदुकीच्या जोरावर यशस्वी झाली नाही असंही ते म्हणाले. गडचिरोली जिल्हा आता मागासलेला राहणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पुण्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2011 09:19 AM IST

महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन

01 मे

आज एक मे अर्थात महाराष्ट्र दिन...राज्य भरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान करणार्‍या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा चौकात सकाळपासूनच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळी हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं. तर शिवाजी पार्कवर राज्यापालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गडचिरोलीमध्ये गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं.नक्षलवाद्यांना त्यांच्याच भाषेत चोख उत्तर देऊ, असा इशारा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिला. कुठलीही क्रांती बंदुकीच्या जोरावर यशस्वी झाली नाही असंही ते म्हणाले. गडचिरोली जिल्हा आता मागासलेला राहणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पुण्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2011 09:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close