S M L

जगदीश खेबूडकर यांना संगीतमय आदरांजली

15 मेज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर यांना ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये त्यांच्याच गीतांनी संगीतमय आदरांजली वाहण्यात आली. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आणि शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्यावतीने आयोजित 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल' या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.'तुम्हावर केली मी मर्जी बहाल' जगदीश खेबूडकरांच्या या आणि अशा अनेक रचनांचा ठाणेकरांना मनमुराद आनंद घेण्याची संधी मिळाली. 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल' या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या रचनांना यावेळी उजाळा देण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण आणि ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले यांची लाभली. यावेळी त्यांनी नानांच्या आठवणी जागवल्या. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनीही भरभरुन दाद दिली.एकूणच भूपाळी असो की लावणी, भावगीत असो वा भक्तीगीत खेबूडकरांच्या हुकुमी रचना रसिकांच्या मनात कायम रुंजी घालत राहणार. तुम्हावर केली मी मर्जी बहाल कार्यक्रम म्हणूनच रसिकांचा मन जिंकणारा ठरला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2011 01:04 PM IST

जगदीश खेबूडकर यांना संगीतमय आदरांजली

15 मे

ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर यांना ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये त्यांच्याच गीतांनी संगीतमय आदरांजली वाहण्यात आली. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आणि शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्यावतीने आयोजित 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल' या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

'तुम्हावर केली मी मर्जी बहाल' जगदीश खेबूडकरांच्या या आणि अशा अनेक रचनांचा ठाणेकरांना मनमुराद आनंद घेण्याची संधी मिळाली. 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल' या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या रचनांना यावेळी उजाळा देण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण आणि ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले यांची लाभली. यावेळी त्यांनी नानांच्या आठवणी जागवल्या. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनीही भरभरुन दाद दिली.

एकूणच भूपाळी असो की लावणी, भावगीत असो वा भक्तीगीत खेबूडकरांच्या हुकुमी रचना रसिकांच्या मनात कायम रुंजी घालत राहणार. तुम्हावर केली मी मर्जी बहाल कार्यक्रम म्हणूनच रसिकांचा मन जिंकणारा ठरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2011 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close